नयनी तुझ्या
शब्दांशिवाय भावना दिसतात नयनी तुझ्या
शब्द दडले डोकावून हसतात नयनी तुझ्या
गजरा माळून माझे भाव टिपशी आरशात
ताटवेच्या ताटवे फुलतात नयनी तुझ्या
वीज येवून मिळावी पावसात चिंब मिठी
थेंबहि मग पाण्याचे भिजतात नयनी तुझ्या
तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो
चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या
तु समोरी येताच माझे शब्द देतो फेकूनी
पाहूनच ऐकतो ते बोलतात नयनी तुझ्या
निरोप कशाला घ्यायचा मनास वाटे जरी
निरोपाचे हातहि मग झुरतात नयनी तुझ्या
ऋषिकेश
(१४-०५-२००९)
मिसळपाव

