"आणि मग एके दिवशी.." (नसीरुद्दिन शाहचे आत्मचरित्र)
नटनट्यांची आत्मचरित्रे म्हटली की ती खमंग मसालेदार गॉसिपने भरलेली असणार असा एक रूढ समज आहे. काही अंशी तो खरा असेलही. पण त्याच्याशी फक्त अभिनेता असण्या-नसण्याचाच संबंध नसतो. प्रामाणिकपणा आणि वाचनीयता हे दोन गुण कोणत्याही आत्मचरित्रात असावे लागतात आणि सगळ्यांना ते जमत नाही. परिणामी ती रटाळ, नीरस आणि लबाड होऊन जातात. खासकरून राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे.
सत्यकथनाची हिम्मत नसेल तर फिल्मी आत्मचरित्रेही "फ्लॉप" होऊ शकतात. उदा. देव आनंदचे 'Romancing The Life' हे पुस्तक. ही त्याच्या आयुष्यातील अगोदरच सर्वविदीत असलेल्या घटनांची निव्वळ जंत्री आहे. लहानपणीचा काही काळ वगळता नवे हाती काहीच लागत नाही.
मिसळपाव