Skip to main content

समीक्षा

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

लेखक खेडूत यांनी सोमवार, 13/07/2015 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?

बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे'

लेखक सव्यसाची यांनी बुधवार, 01/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी कोर्ट चित्रपटाबद्दल लिहिताना मी असे म्हटले होते कि दैनंदिन घटनांचे चित्रण पाहायला मला आवडते. 'कोर्ट' मध्ये न्यायालयातील सुनावणी ही अश्याच दैनंदिन गोष्टींपैकी होती. 'कोर्ट' पाहून झाल्यावर लगेचच तश्याच धाटणीचा एखादा चित्रपट पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. पण ती वेळ काल आली. 'आशा जावर माझे' हा बंगाली चित्रपट. पण इथे भाषा कोणती याचा काहीच फरक पडत नाही कारण चित्रपटात संवादच नाहीत. पार्श्वसंगीत सुरु असते, लोक बोलतात, रेडीओ वर गाणी सुरु आहेत पण चित्रपटामधील मुख्य पात्रे मात्र काहीच बोलत नाहीत. या चित्रपटाचे इंग्रजी मधील नाव आहे - लेबर ऑफ लव्ह. परंतु हे शब्दशः भाषांतर नाही.

“मिपा वाचकांनो थोडीतरी खाज बाळगा!

लेखक नाखु यांनी मंगळवार, 30/06/2015 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
नेतागिरी नेते मा. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदारचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १८ जुलै १९७६ पूर्वी नेता पित्त्यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण नेता पित्त्यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण या राष्ट्रीय धुरंधर नेत्याने गाव-गुंड पुंडांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा कायद्याला घाबरणारा नेता समाज गावात सोडलेल्या बेफाम वळूसारखा उधळू लागला. नुसताच उधळू लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा नेता चक्क मूठ आवळून त्यालाच दिमतीला बोलावू लागला. विधायक विचारवंतांशी दोन हात करायला सज्ज झाला.

डोमिसाईल हवंय.... ? ?

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 23/06/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं? अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय.