तर आता असं बघा, सलमानचा 'जय हो!' चित्रपटगृहामध्ये झळकलेला आहे. सलमानच्या प्रतिमेला साजेसा चित्रपट असेल या अपेक्षेने जनतेने चित्रपटगृहाकडे पावले वळवली खरी परंतु घात झाला, पावले थिजली, नजरा स्तब्ध जाहल्या, हात शिट्ट्या मारण्यासाठी ओठांकडे न जाता गपगुमान खिशात गेले, पायाच्या बोटांनी शरमेने मान खाली घातली, चेहरे सुकले, हसू मावळलं, हळद रुसली, कु़ंकू हसलं...असे काय बरे जाहले?
चित्रपट सुरु होतो ते एका युवतीच्या अपहरणाच्या प्रसंगाने.