Skip to main content

शुभेच्छा

कण्याचा धड़ा

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 07/09/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
-----------------कण्याचा धड़ा--------------- "26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा." सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा. पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे. 12वीत गॅप घेतलेला.

शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 06/09/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

स्पर्धा - शतशब्दकथा.( स्पर्धेसाठी नाही)

लेखक जेपी यांनी गुरुवार, 06/08/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे. ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस. तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती. ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत. तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका. ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ? तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया. ती - शिर्षक काय द्यायच कथेला ? तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.

(वाया) (मयपूर कथा)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 04/08/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
*** आमची प्रेर्ना शनिवारच्या रात्री मस्त तीर्थ-प्रसाद चापून, वाँकिंग झॉँबी मँरेथॉन करता करता साधारणपणे मला अर्ध्याएक मिनिटे (काल सापेक्ष असतो, चुभुघ्याद्या.) सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला हलविल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावंस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझ्या घशातून बाहेर यायला पहात आहे असे वाटत होते.

पलायमान (हतबुद्धी)

लेखक सूड यांनी शुक्रवार, 31/07/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
झंप्या:- उरकलं की नाही रे? गंप्या:- झालं, पण काहीतरी राह्यल्यासारखं वाटतंय!! झंप्या:- अस्सं? मग उरक लवकर!! गंप्या:- तेच! झंप्या:- तेच काय? उरक म्हटलं ना तुला? गंप्या:- थांब की जरा! झंप्या:- अजून? जातोच मी आता? गंप्या:- आलो म्हटलं ना तुला!! झंप्या:- तंतरली ? गंप्या:- ............ झंप्या:- बोल ना तंतरली? गंप्या:- खिक्क!! झंप्या:- दात काय काढतोस! कोणीतरी येईल आता. निघ की लवकर!! गंप्या:- राजें, जरा मान उंचावून वर बघा!! झंप्या:-अच्छा? तुला नाही दिसत? तूच बघ नि सांग!! गंप्या:-पलिकडल्या खाचरातून तुझी आवडती व्यक्ती येत्ये!! झंप्या:- कोण? ती आपली मधल्या आळीतली मधू? गंप्या:- आपली? नानाची टांग तुझ्या!!

मराठी विकिपीडियावरून स्वांतत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी

लेखक माहितगार यांनी रविवार, 26/07/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी...

सायकलिंग ह्या स्पोर्टमध्ये भारतीयांनी मिळवलेला विजय,

लेखक वेल यांनी सोमवार, 29/06/2015 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक मधील डॉ महेन्द्र महाजन वय ३९ आणि डॉ हितेन्द्र महाजन वय ४४ यांनी जगातली एक अत्यंत कठिण सायकल रेस अमेरिकेतील RAAM आज पूर्ण केली. ही रेस त्यांनी team india:vision for tribals ह्या नावाने टीम रेस म्हणून पूर्ण केली. ३००० मैलाची ही रेस दोन जणांच्या ह्या टीमला नऊ दिवसात पूर्ण करायची होती. ती त्यांनी आठ दिवस चौदा तास आणी ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंचे अंतर ह्यात पार करायचे होते. अनेक घाटांमधून जाणार्‍या रस्त्यावर ९००० फूट उंचीचा सर्वात मोठा पासदेखील होता.