लेखकविसोबा खेचरयांनी गुरुवार, 08/11/2007 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम भाईकाका,
आज फार चांगला योगयोग जुळून आला आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस, शिवाय ८ नोव्हेंबर, तुमचा वाढदिवस..! त्यामुळे सकाळी सकाळीच तुमच्या सुंदर स्मृतींचं अभ्यंगस्नान आम्हाला घडलं!
मी सर्व मिसळपावकरांच्या तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो..
तुमच्या लाडक्या पोष्टाचं चार रुपयांचं तिकिट डकवून ह्या पत्ररुपी शुभेच्छा पाठवत आहे, तेवढ्या गोड मानून घ्या...
हॅपी बर्थडे टू यू...भाईकाका!
तुमचाच,
तात्या.
लेखकधोंडोपंतयांनी शुक्रवार, 12/10/2007 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळपाव वाल्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
आई जगदंबेच्या कृपेने, शेअरबाजार तुफान कोसळून मार्केटची काशी होवो, अशी प्रार्थना.
आपला,
(तेजी-पीडित) धोंडोपंत
आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो.....
आई जगदंबे...... या धोंड्याला पाव गं पाव !!!!!
लेखकचित्तरंजन भटयांनी मंगळवार, 18/09/2007 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात.
तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.
लेखकधोंडोपंतयांनी रविवार, 16/09/2007 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करून तमाम मराठीप्रेमी जनतेची बौध्दिक आणि वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य सुरू केल्याबद्दल तात्या सरपंचांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
या संकेतस्थळामुळे मराठी लेखनास आसुसलेल्या सृजनशील व्यक्तिंना कोणत्याही फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल आणि इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल.
त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा.
आम्हीही एक मिसळपाव व चहा हादडून मस्तपैकी तंबाखूपान लावून येतो.