सखाराम गटणेंचे हर्दिक अभिनंदन व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा! :)
राम राम मिपाकरहो,
मिपाचे एक सन्माननीय सदस्य सखाराम गटणे यांनी स्वत:चा खरडफळा सुरू केला आहे त्याबद्दल मी समस्त मिपाकरांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा देतो!
हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते. आणि म्हणूनच गटण्यांचे मला व्यक्तिश: विशेष कौतुक वाटते. कारण मीही एक बंडखोरच मनुष्य आहे आणि मिपाचा जन्मदेखील बंडाळीतूनच झाला आहे!
असो,
नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा! :)
तात्या.
मिसळपाव
आपल्या अखंड मेहनतीने, जिद्दीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: हुकुमत गाजवणार्या, सूरालयीवर विलक्षण प्रभूत्व असणार्या, आश्चर्याने चकित व्हावं अशी गळ्याची फिरत लाभलेल्या, या मराठमोळ्या अवलिया गायिकेला समस्त मिसळपाव परिवारातर्फे ७५ व्या वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा....!
आशाताई, जियो....!
तात्या.
डॉ.गंगाधर पानतावणे सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
अमेरिकेत होणार्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.