लेखकप्यारे१यांनी मंगळवार, 12/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभू रामचंद्र की जय!
रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले.
सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे.
रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना.
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
श्रीराम जयराम जयजय राम।
लेखकचिंतामणीयांनी रविवार, 10/04/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात.
त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे.
तो लेख येथे वाचा.
लेखकवपाडावयांनी बुधवार, 06/04/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर :
आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही.
मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले..
त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा...
ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ...
दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
.
.
.
.II श्री अष्टविनायक प्रसन्न II
आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, .
...
लेखकमृत्युन्जययांनी मंगळवार, 05/04/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?
लेखकसुधीर काळेयांनी रविवार, 03/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.
लेखकइंटरनेटस्नेहीयांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन!
आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले!
-
(अतिशय आनंदी) इंट्या.:)
लेखकमृत्युन्जययांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.
लेखकविनीत संखेयांनी मंगळवार, 29/03/2011 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे सदस्यगण हो,
कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय.
जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती.
धन्यवाद
विन्या.
(मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)
लेखकइंटरनेटस्नेहीयांनी मंगळवार, 22/03/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो,
आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे!
सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही.
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.