शशक- एका पायाचा कावळा
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय."
सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले?
मिसळपाव
श्री० मोहन भागवत यांच्या २०२१ पासून आजपर्यंतच्या भाषणांचा ए०आय० च्या मदतीने सारांश काढायचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यातून विश्वगुरु, म्हासत्ता इ० गाजरांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग किंवा कार्यक्रम मिळावा. पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत.