महाजनस्य संसर्गः
महाजनस्य संसर्गः
-राजीव उपाध्ये
पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स
पञ्चतंत्रात एक श्लोक आहे : महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः। पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥ ‘मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते,’ हा याचा अर्थ.
अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो, की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे आहे.
मिसळपाव