अल्पना
यंदाच्या लोकसत्ता च्या दिवाळी अंकात एक लेख वाचत होतो आसाराम लोमटे यांचा भवताल आणि भुमिका नावाचा. लेख अत्यंत सुंदर आहे त्यात एके ठीकाणी लोमटे त्यांच्या एका कथेचा उल्लेख करतात त्यात एका कार्यकर्त्याची कथा आहे नेत्यांसाठी त्याची संपलेली उपयुक्तता. टीचलेपण दाखवण्यासाठी एक शब्द वापरलेला "टिचरीगोटी" टीचलेली गोटी लहान पोरं सुद्धा खेळात घेत नाहीत. दुसरा शब्द "उकळलेली पत्ती" ज्याची रग आणि धग वापरुन झालेली आहे असा वापरुन फ़ेकलेला कार्यकर्ता अशा अर्थाने हे शब्द त्यात येतात. आता ती कथा वाचलेली नाही मात्र अगदी एका नेमक्या योजलेल्या शब्दात किती ताकद आहे बघा.
मिसळपाव