सोशल नेटवर्किंग (भाग ६)
'sorry पण सध्या मी इथे नसणार आहे दोन महिने. एका कामासाठी जर्मनीला जातोय परवा. परत आल्यावर बोलूच. see you.'मल्हारचा हा असा मेसेज सिद्धांतला अनपेक्षित होता. त्याने फक्त दोन शक्यता गृहीत धरल्या होत्या. एकतर हो किवा नाही. पण आता मल्हारला भेटण्यासाठी दोन महिने वाट पहावी लागणार होती. या एकूण प्रकरणातच काहीतरी प्रोब्लेम आहे असे सिद्धांतला वाटत होते. इथे मयंकही गाल फुगवून बसला होता. त्याचे चित्त थाऱ्यावर आणणे गरजेचे होते. त्याने कॉम्पुटर लावला. आणि मयंकला हल्लीच store केलेले नवनवीन wallpaper दाखून लागला.
हा सिद्धांताचा छंद होता.
मिसळपाव