विरंगुळा
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २०
मागिल भाग..
मी मात्र आता अत्यंत दाटलेल्या गळ्यानी, "काका...येताना क्याटबरी नक्को..गाण्याची पुस्तकंsssss!!!!" असं उंबर्यातून ओरडलो, आणि टच्च भरलेल्या डोळ्यांनी ..काका दिसेनासा झाल्यावर गप्प चेहेरा करून ..गुरुजिं समोर त्या लालमातिच्या ग्गार भिंतीला पाठ टेकवून बसलो!
पुढे चालू...
=======================
माझा चेहेरा पाहून काहि विद्यार्थी गालातल्या गालात हसत,तर काहि जणं चेहेर्यानीच माझ्याशी सहमत होत होते. पहिलाच दिवस असल्यामुळे गुरुजिंनी मला लगेच शिकवायला घेतले नाही.
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १९
(या मागिल भागापासून सांधा जरा बदलला गेला असल्यामुळेच ,नविन भाग लिहायला हा बराच वेळ-गेलेला आहे.त्याबद्दल प्रथमच क्षमा मागतो.. आणि पुढे वाचायची अगत्यपूर्वक विनंती करतो. :) )
मागिल भाग- १८
याला कारण असं की आमच्या काकाचा "माणूस चुकतो" ह्या घटनेवर जबरदस्त विश्वास होता. वास्तविक कोकणातल्या एका छोट्या खेड्यात कुठल्याच प्रकारचं फारसं शिक्षण न झालेला हा माणूस.
भव्यत्वाची जेथ प्रचिती! वेरूळ..सफर आणि बरेच काहि! १
(शीर्षकामुळे आशय बदललाय की काय? किंवा का बदललाय? असं जरूर वाटेल.पण येथले दिव्यत्व त्या भव्यत्वात अनुस्यूतच आहे. अजुनंही अंगावरचे रोमांच हलत नाहीयेत.. )
दहा तारखेला भल्या (थंडिच्या) पहाटे, आमच्या पुण्यपत्तनखाज'गीवहातुकप्रवासीउपकारांकितगतजन्म्पुण्यबॅलन्सनिमित्तेनरिक्षाप्राप्तीअतीशुभयोगा मुळे (हुश्श्श्श्श् :-/ ..काय ती शब्दलालं'सा! =)) ) एकदाचे आंम्ही तिघे म्हणजे मी (उर्फ..स्वआर्तिक्यकुशल! ;) ) धन्या (उर्फ छोटा हत्ती,मंजेच आगोबाचा भाऊ!
कट्टयाचा चा दरबार म्हणू दरबारचा कट्टा???
सर्वत्र अगरबत्तीचा मंद दरवळ पसरत होता.स्वयंसेवकांची लगबग चालू होती.
चित्रकृती
{खुला"सा! :- (माझी १४ वर्षानंतर सुरु झालेली ही चित्र[कला] अजुन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. फक्त एक आयड्या लोकांपर्यंत पोहोचवावी..एव्हढ्याच हेतूने हे सादर करत आहे.. :) त्यामुळे चित्राकडे दुर्लक्ष करावे. __/\__ ) }
काय मि.पा.करांनो??? शिर्षक वाचून एकंदर अंदाज आला नसेल ना? किंवा आलाच असेल,तर तो खालिल चित्र-कृती पाहिल्यावर चुकेल! ( कारण ही कोणती विशिष्ट चित्रकृती नसून्,फक्त तेलताटावर चित्र काढण्याची-कृती आहे! ;) ) काय आहे,की चित्रकला हा माझा अवडता विषय.पण प्रसंगचित्र आणि व्यंगचित्र याच्या बाहेर मी फारसा कधिही गेलेलो नाही.
आजोळच्या गोष्टी – ३
आजोळच्या गोष्टी – ३
औदुंबरला दत्त मंदिराशेजारूनच संथ वाहते कृष्णामाई. नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. काठाला नारळाची जांभळाची झाडे एका रांगेत होती. एकदा आईने माझ्या मामाला मला पोहायला शिकवायची जबाबदारी दिली आणि माझा पोहणे शिकण्याचा उपक्रम पुढे अनेक वर्षे चालला. माझा एक मामा अगदी पट्टीचा पोहणारा. पुरात उडी टाकून भोवरा हाताने फोडणे वगेरे धाडसी प्रकार सहज करी. मी त्याला घाबरून असायचो अगदी. मी २-३ वर्षाचा असताना माझे बुडता बुडता वाचण्याचे सोपस्कार झाले होते. मामाने अगदी मजेत सांगून टाकले आईला कि "छाया, काळजी नको. आता हे काम माझ्याकडे लागले".
आर्ट ऑफ द स्टेट
नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती.
मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो.
एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्
कथा-कॉलेज कट्टा भाग २
सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!!!!!!
मागील भाग
कथा-कॉलेज कट्टा भाग १
या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे.
तो दिवस होता २६ ऑगस्ट २०१२.डी.वाय पाटील कॉलेजच्या ऑफीसच्या बाहेर अॅडमिशनसाठी भली मोठी रांग होती.
"यार,ज्ञानेश्वर आपण उद्या येउयात का?" अभिनवने सवाल केला.
अभिनव दहा दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता.मुळचा अहमदनगर मधील अभिनवचा मेकॅनिकल इंजिनीअरींगमध्ये डिप्लोमा पूर्ण झाला होता.
न झालेला पुरुषांचा कट्टा- औरंगाबाद.
खुप दिवसांपासुन नुसत्या पुरुषांचा कट्टा करायचे ठरले होते. सर्वांनी जवळ जवळ पंचवीस डिसेंबरच्या कट्ट्याला होकार कळवला होता. पुरुष म्हणजे या भुतलावर अवतरलेला पहिला सजीव. काही अदिमानव पुण्याहुन, काही ठाणे, आणि काही मुंबैवरुन येणार होते. जगप्रसिद्ध बीबीका मकब-याला ठीक अकरा वाजता यायचं आमचं सर्वांचं ठरलं होतं. पुण्याहुन धन्या, सुड, वल्ली, प्रशांत, बॅटमन, आणि इस्पिक एक्का. ठाण्यातून मुवि, डॉ.सुबोध खरे, किसन शिंदे, आणि गवि, मुंबैतुन आणि दुबैवरुन थेट कुंदन येणार होता. सध्या मुंबैत आलो तर येतोच बोलला. जेपी आणि टवाळ कार्टा यांना मिपावर मिपा मिपा खेळायला मिळणार होतं म्हणुन ते येणार नव्हते.
मिसळपाव