Skip to main content

विरंगुळा

एक होता राजा....

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/03/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान. "पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी. "तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत" " अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले? "सौरव गांगुली.

नक्षत्रं आणि राशी

लेखक असुर यांनी मंगळवार, 13/03/2012 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नक्षत्रं आणि राशी, असं नाव वाचून साधारण जो ग्रह होणं शक्य आहे, तसा राशीचक्राचा इथे संबंध नक्कीच आहे, पण थोडा वेगळ्या अर्थाने. एखादा खगोलावरचा लेख अल्पमती साथ देते तसा लिहावा हा प्रयत्न आहे. अगदीच कुणाला आवडलाच लेख, आणि चार दोन लोकांचा इंटरेस्ट वाढलाच खगोलशास्त्रात, तर आम्ही स्वतःला धन्युधन्यु समजून घ्यावे ही अल्पशी अपेक्षा. बाकी ज्योतिष या विभागाकडे वळायचा माझा अजून तरी धीर होत नाही बुवा. 'faith is a gift I'm yet to receive' असं कुठेतरी, कोणीसं, काहीसं म्हणून गेलं ना; तसं माझं या ज्योतिषाबाबत झालंय.

केबल कफ कॅप

लेखक जयवी यांनी सोमवार, 12/03/2012 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती.

आज की ताजा खबर ...ठाण्यात आनंद दिघे साहेब अवतरले ......

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 10/03/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
धुळवडीची संध्याकाळ...सर्व जग रंगांत आणि बऱ्याच इतर गोष्टीनी रंगून जावून शांत झालेले . रस्त्या रस्त्या वर तुरळक वाहतूक . संसारिक आणि पेंशनर चेहेरे फक्त रस्त्यावर उरलेले....... अचानक जांभळी नाका तळपली जवळील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजव आनंद दिघे अवतरले. सुरुवातीला कोणाचच लक्ष त्यांच्याकडे गेले नाही . काही जुने जाणते शिवसैनिक ,असे की आता त्यांना कोणीही विचारात नाही तळ्याजवळ छत्रपतींच्या पुतळ्याची अवस्था पाहायला आले होते .आनंद दिघे साहेबाना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हा हा म्हणता त्यांच्या भोवती गर्दी जमली . दिघे साहेब नेहमीच्या सवयीने पाई चालत आनंद आश्रमाच्या दिशेने निघाले..

भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 08/03/2012 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता.

((मामांच्या मनाचे शोक))

लेखक चिम् चिम् मामा यांनी बुधवार, 07/03/2012 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
((मामांच्या मनाचे शोक)) सदा सर्वदा रस्ता मोकळा असुदे, माझ्या समोर कुठली गाडी नसुदे...! ज्या...ज्या ठिकाणी गाडी जाये माझी, त्या...त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल रूप तुझे...! मी पार्क करतो गाडी ज्या ठिकाणी, तिथे नो पर्किन्ग ची नको निशाणी...!

स्टोल

लेखक जयवी यांनी बुधवार, 07/03/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
लेकीची फरमाईश......मला स्टोल हवा......तो सुद्धा काळा.....!! वाढदिवस जवळ येतोय म्हटल्यावर नाही कसं म्हणणार....... दोरा घेऊन आले आणि केली सुरवात :) DSC00497" width="480" height="360" alt="" />

भांग का रंग जमा हो...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/03/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
होळी येतेय.. सगळ्यांनी मस्त पैकी रंगात रंगून मजा करायचा हा दिवस.. "होळी रे होळी, पुरणाची पोळी.." म्हणत मस्तपैकी पुरणपोळ्या रिचवायचा दिवस.. होळीच्या दिवशी पत्ते खेळणे, लिटल-लिटल घेणे आणि भांग पिणे हेही चालतं. आमच्या लहानपणी आम्ही वार्निश वगैरे पण माखायचो एकमेकांना, आणि मग आई आमच्या अंगाला कपडे धुवायच्या साबणाने घासून, गरम पाण्याने अंघोळ करायला लावायची. (आमच्या "शिशू की कोमल त्वचा"चं कुणाला काय पडलीच नव्हती.. :-)) तर मोठे झाल्यावर आम्हाला भांग (?) पण प्यायला मिळायची होळीच्या वेळी.. त्याचाच हा अनुभव.. मी कॉलेजला फर्स्ट इयरला असतांना दादाचा ग्रुप आमच्या गावी होळी साजरी करायला आला होता.