लेखकअँग्री बर्डयांनी बुधवार, 04/04/2012 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
तेलगु पिक्चर बघायची हौस दांडगी आहे, शक्यतो जो येईल तो बघितला असे मी करत नाही, कारण त्यातून काहीतरी चांगले निघेल ह्याची वाट बघत धीरोदत्तपणे चित्रपट पाहण्याएवढे patience माझ्याकडे मुळीच नाहीत.
लेखकयकुयांनी रविवार, 01/04/2012 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिहायला बसण्यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्या काळाच्या मंद गतीने आयुष्य उलगडत जाते; आणि आयुष्याचं सुस्पष्ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही.
लेखकयोगप्रभूयांनी रविवार, 01/04/2012 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
सम्राज्ञी गांधारीदेवींच्या भेटीला जाताना आपल्या मनातील योजना संशय येऊ न देता कशी मांडायची, यावर भानुमतीने बारकाईने विचार करुन ठेवला होता. राजमाता कुंतीदेवी आणि पांडव स्त्रियांनी आपला अपमान केला, हे गांधारीदेवींना सांगून चालणार नव्हते. तसं सांगितलं असतं तर उलट 'बरी जिरली सुनेची' म्हणून थेरडी मनातून सुखावली असती. त्यातून पांडवस्त्रियांचे एकवेळ ठीक, पण कुंतीदेवींबद्दल उलटसुलट सांगून चालणार नव्हते. सुनांवर दबाव ठेवण्यात या म्हातार्या नेहमीच एकमेकींच्या मैत्रिणी असतात.
लेखकयोगप्रभूयांनी शुक्रवार, 30/03/2012 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया कालकुपीत बंदिस्त या कथानकातून कुणीही मस्तकदाह करुन घेऊ नये, अथवा विचित्र अन्वयार्थ शोधू नयेत, अन्यथा मनःस्तापाखेरीज काहीही हाती लागणार नाही.)
.................................................................................................................................
एक दीर्घ वळण घेऊन राजरथ इंद्रप्रस्थाच्या बाहेर पडला आणि कुरु राजस्नुषा भानुमतीने अस्वस्थपणे मागे मस्तक टेकले. मोकळ्या वार्याची झुळूकही तिला आता सुखावत नव्हती. संतापाने फुललेले तिचे आरक्त नेत्र आता भरुन आले होते. शेजारी बसलेल्या सखी वृषालीने तिची ही अवस्था जाणली.
लेखकनरेंद्र गोळेयांनी गुरुवार, 29/03/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते.
लेखकसस्नेहयांनी मंगळवार, 27/03/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे दिवस. उकाडा जबरदस्त वाढलेला. आणि गावात चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले. दर ४-५ दिवसांनी एक एक नवीन चोरी होऊ लागलेली. भुरटे, सराईत आणि हुमदांडगे असे सगळेच चोर मोकाट सुटलेत की काय असे वाटण्या इतके चित्रविचित्र , सुरस आणि चमत्कारिक चोऱ्यांचे प्रकार ऐकायला मिळू लागलेले. एक एक किस्से ऐकून लोक थक्क होत.
होता होता एक दिवशी चक्क आमच्या कॉलनीतच चोरी झाली. तोही प्रकार इतका चमत्कारिक की पहाटेच्या वेळी कटावणीने दार उघडू पाहणाऱ्या चोरांना घरातील आजोबांनी (चष्मा घातला नसल्यामुळे) मालकाचे मित्र समजून स्वत:च कडी वगैरे काढून आत घेतले !
लेखकसर्वसाक्षीयांनी सोमवार, 26/03/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पश्चिम क्षितिजावेळ काही काळ एक तेजस्वी चांदणी/ तारा चंद्रकोरीच्या बराच जवळ दिसत होता. अर्थात फोटोमध्ये ते बर्यापैकी दूर दिसतात पण ती फ्रेम म्हणजे विस्तिर्ण क्षितिजावरचा एक लहानसा भाग आहे त्यामुळे तसे दिसते.