Skip to main content

विरंगुळा

निरोधला विरोध!!!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 10/08/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
निरोधला विरोध! पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय. प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो.

गुमराह

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 10/08/2011 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्‍या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते.

कानसेन कोण? २०११ - ४

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 09/08/2011 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी. या भागात थोड्या पुढल्या काळातील गाणी देखील येणार असून हिंदी-मराठी असं कॉम्बिनेशन आहे. आता बिगरी का एम.ए. ते ठाऊक नाही ब्वॉ.. ज्याची त्याची जाण, समज, आवड, निवड इ. इ.

सौंदर्याचा बाजार

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 09/08/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय.

कानसेन कोण? २०११ - २

लेखक प्रभो यांनी सोमवार, 08/08/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काल-परवा बहुगुणी काकांनी म्हटल्याप्रमाणे एक-दोन आठवड्यांपासून कानसेन परत सूरू करावं असं मनात होतं.. दोन चार मित्रगण आणी बहुगुणी काकांशी व्यनिमनीच्या गोष्टी केल्यावर सर्वांनी होकार भरला. त्याचा पहिला भाग गणपाशेठ नी टाकला आहेच. गणपा ऑफिसातून घरी निघाल्याने तो काही १-२ तास आता धागा पाहू शकणार नाही. तर आपण पुढचा भाग चालू करूयात. मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या. डिस्क्लेमर १. मेघवेडा, मस्त कलंदर, गणपा, बहुगुणी, रेवती,चतुरंग (शेवटचे तीन जसा वेळ मिळेल तसं) ही मालिका चालू ठेवण्यात भाग घेतील, पण आम्ही एकमेकांची गाणी सिलेक्ट केली नाहियेत.

आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो. आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे. त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..

दृष्टीभ्रम

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 05/08/2011 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
मीटिंग निमित्ताने एका हॉटेल मध्ये आलो आहे, मधे थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून मिपावर चक्कर टाकावी म्हणून लाऊंज मध्ये बसलो तर घडलेला किस्सा: बर्‍याच खुर्च्या कलात्मक रीत्या मांडून ठेवलेल्या या लाऊंजमध्ये माझ्या खुर्चीखाली एक wavy पॅटर्नचा गालिचा होता. तो गालिचा क्रॉस करून पलिकडे जाणार्‍या आईच्या मागे दुडुदुडू धावत आलेलं दोन-अडीच वर्षांचं बाळ. आई फरशीवरून गालिच्यावर, आणि मग गालिच्यावरून परत पलिकडच्या फरशीवर चालत निघाली.