Skip to main content

विरंगुळा

छायाचित्रे खडगपूरची

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 02/05/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक, अनेक दिवस मिपावर काही फोटो टाकायचे मनात होते, आता परीक्षा संपल्या असल्या कारणाने वेळ मिळतोय. त्याचा सदुपयोग म्हणून काही फोटो तुमच्यापुढे मांडत आहे.

१ मे : द हार्ट कनेक्षन

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 01/05/2011 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्‍यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्‍याच गोष्टी समान आहेत. संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रिखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत. पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आण इमराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम. मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे.

दिल्लीतील काही पुरातन वास्तू

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 30/04/2011 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत एक दिवस राहण्याचा योग खूप दिवसांनी आला, थोडा फेरफटका मारून आलो. या वास्तूंबद्दल फार काही इतिहास माहीत नाही पण खूप फोटोजेनिक वाटल्या.

नियतीने दिलेले संकेत दुर्लक्षिले की समजलेच नाहीत !! - एक कथा-

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 28/04/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीने दिलेले संकेत दुर्लक्षिले की समजलेच नाहीत !! - एक कथा-
असे काय घडले की ज्यामुळे आज अनुकूल हॉस्पिटलात जखमी होऊन पडला आहे? अपघाताच्या आधी त्याला कोणताही शुभ-अशुभ शकून समजला नाही? की त्याने शकूनांतून मिळणार्‍या संदेशांकडे दुर्लक्ष केले? नाव - अनुकूल शिक्षण - बी.ई. सॉफ्टवेअर (फर्स्ट क्लास) पेशा - सॉफ्टवेअर इंजीनिअर (उच्चपदस्थ) कौटुंबिक स्थिती - सुस्थित आई - उच्चशिक्षित,वास्तुशास्त्री वडिल - उच्चशिक्षित नोकरदार आज बाईकवरुन जाताना वळणावर अपघात होऊन अनुकूलच्या उजव्या अंगाला मार बसला आहे. तो आज हॉस्पिटलात जखमी अवस्थेत आहे.

पोर्ट्रेट फोटोग्राफिचा एक प्रयत्न.

लेखक येडाखुळा यांनी मंगळवार, 26/04/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री शरद यांचा "मिपावरील छायाचित्रे ... एक निरिक्षण" हा लेख वाचला आणि मला माझ्याकडे असलेली काही पोर्ट्रेट अपलोड करायचा मोह झाला. ही काही फार सुंदर छायाचित्र आहेत असं नाही म्हणता येणार पण त्या क्षणी मला जे कॅमेर्यात पकडावस वाटलं ते इथे मांडतोय. सासवड-जेजुरी च्या परिसरात फिरत असताना हा धनगर दिसला. यांची पागोटे घालण्याची पद्धत खूप मस्त असते.

क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 25/04/2011 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व आमचे कडे आले असतांना चौसष्ट साली आम्ही हा लेख लिहिला. त्यावर अनुकूल-प्रतिकूल मतांचा पाऊस पडला. आज अनेक वर्षांनीसुद्धा परिस्थिती निराशाजनकच आहे असे पाहून लेख येथे टंकित केला आहे. सूज्ञांच्या अभिप्रायांचे स्वागतच आहे. आजकाल पाहतो तर क्रिकेटचा प्रचार वाढतोच आहे.

हत्ती, घोडे, उंट!

लेखक रेवती यांनी सोमवार, 25/04/2011 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यापूर्वी चिरंजिवांचा शाळेतला चेसक्लब बंद झाला आणि टाऊनच्या लायब्ररीत दर दोन अठवड्यांनी होणार्‍या बुद्धीबळ स्पर्धेला जायला सुरुवात झाली. अर्थातच बाबा त्याला घेऊन जात असतात. गेल्या दोन अठवड्यांपासून मात्र मलाही तयारीत ओढण्यात आले......... म्हणजे त्यांच्या गटातून बाहेर काढले गेले. डाव चालू असताना मध्येच येऊन जेवणासारख्या कमी महत्वाच्या गोष्टींसाठी न बोलावणे, दिनक्रमाची सक्ती न करणे, हत्ती, घोड्यांच्या भाषेत बोलल्यासच म्हणणे ऐकणे, असे प्रकार सुरु झाले. भारतीय क्लबतर्फे दरवर्षी होणारी बुद्धीबळ स्पर्धा जवळ आल्याची सगळी लक्षणे होती.

राडा...? छे छे! संशयकल्लोळ!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 24/04/2011 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या काही कलाकारांना पुण्यात धुंद अवस्थेत "मोकळ्या' वातावरणात फिरताना पोलिसांनी पकडलं. त्यांच्याबद्दल पेपरात भरपूर बदनामीकारक बातम्या छापून आल्या. खरंतर चांगल्या घरातल्या, सालस, सज्जन अशा या कलाकारांनी काहीच केलं नव्हतं. त्यांच्या जराशा मोकळेपणाच्या वागण्यानं त्यांच्यावर निष्कारण बालंट आलं होतं, हे त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पालकांनीही केलेल्या खुलाशांवरून स्पष्ट झालं.

"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-८ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 24/04/2011 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-८ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय" मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे © सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने) या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत