Skip to main content

विरंगुळा

बहावा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 24/04/2011 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारचे दीड वाजले . उन मी म्हणत होते. ही काय फोटो काढायची वेळ आहे का ? असं मनाशी म्हणत मी गाडीला स्टार्टर मारला. रस्ता वळणा वळणाचा होता. शेवटच्या वळणावर पोहोचल्यावर मात्र सगळे विसरून मी पहातच राहिलो. आकाशातून पडणारा तीव्र प्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडे पर्यंत कोवळा होऊन जात होता.

एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 21/04/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय. इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते.

सुंदर माझा गाव !!!

लेखक परदेश् वासी तरिहि घाटी यांनी गुरुवार, 21/04/2011 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपा कर, मी एक नवीन मिपा कर आहे. सध्या व्हर्जिनिया टेक या अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ वॉशिंगटन डीसी पासून ३०० मैलावर ब्लॅकस्‍बर्ग या छोट्याश्या गावात आहे. विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. नुकतेच मी काही फोटो घेतलेत. ते इथे सादर करत आहे. आशा करतो कि मिपा कर चांगला प्रतिसाद देतील. फोटोंवर प्रतिक्रिया दिल्यास अति उत्तम.

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 19/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात.

सरुटॉबानेच्या कट्ट्याचे फायनल डिटेल

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 15/04/2011 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/17534 इथं दिलेल्या आमंत्रणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद. आतापर्यंत ज्यांनी कनर्फ्म केलंय ते आहेत वल्ली, मनराव, गणॅशा,, टारझन, साधासुधासौरभ, पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा, छोटा डॉन , वपाडाव,मी,प्यारे१ ,म्रुत्युंजय, आत्मशुन्य. बुकिंग झालेलं आहे, अजुन पण कुणि येणार असेल तर क्रुपया उद्या ११ वाजेपर्यंत कळवा. इथं धाग्यावर वरची लिस्ट च्योप पास्ते करुन त्यातच नावं वाढवलीत तरी चालेल. मला किंवा वल्लीला व्यनि केला तरी चालेल. वरच्या सगळ्यांना व्यनि केलेलाच आहे.

पोपटाची सदिच्छाभेट

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 15/04/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या परिसरात पोपट बहरले आहेत. माझ्या आणि रामदासशेठच्या घरादरम्यान असलेल्या वृक्षराजीत सकाळी सकाळी पोपटांचे थवेच्या थवे इकडुन तिकडे उडत असतात. आमच्या इमारतीच्या परिसरातील लाल तुर्‍यांच्या फुलांच्या झाडावर या पोपटांची नजर असते, त्यांना ही फुले खायला विशेष आवडत असावीत. फांदीवर बसुन उलटे लटकत चोचीने फुले खुडणारे पोपट रोज पाहावयास मिळतात.

कॉमनसेंस आणि पालीचं पिल्लू

लेखक विनीत संखे यांनी गुरुवार, 14/04/2011 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी साधासुधासा विचार करणं आणि तसं वागणं आपल्या हातात नसतं. म्हणतात नं "कॉमनसेंस इज अ सेंस विच इज नॉट सो कॉमन!". मुळातच लग्न झाल्यावर आणि पोरं बाळं आल्यावर कॉमनसेंस वापरणे दुर्मिळ होत जाते हे आपण सर्वच खाजगीत मानतो. अर्थातच मुलांचा अभ्यास घेताना एखाद दुसऱ्यावेळेस हा सेंस कामी येत असेलही, पण त्याबाबतीत पालकांपेक्षा मुलंच जास्त सरस ठरत असतात हेही तितकेच खरे. त्यात पुन्हा स्त्री किंवा मुलगी असल्याचा एक आभिशाप... एमसीपी म्हणजे मेल च्शॉविनिस्ट पिग्स, अर्थात मराठीत, पुरूषत्व हेच प्रगतीचं अन बुद्धिमत्तेचं प्रमाण मानून चालाणारे पुरूष भोवताली असले की अधिकच...

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.