भीती
माझा मराठीत कथा लिहायचा हा प्रथम प्रयत्न. चूकभूल माफ असावी...:)
तिला जरा जास्तच उशीर झाला होता आज. नाही म्हणजे कामं काय असतातच सारखी पण म्हणून रात्रीचे साडे-अकरा ? तरी बरं की तिच्या बॉस ने तिला घरापर्यंत सोडण्यासाठी वाहन पाठवलं होतं. ती तशी कार्यालयापासून दूर राहायची. तब्बल एक तास लागायचा तिला घरी पोहोचायला. आता रहदारी कमी जरी धरली तरी चाळीस मिनिटांच्या आत काही ती पोहोचू शकणार नव्हती. तिने गाडीवाल्याला फोन लावला आणि मुख्य गेट वर वाट बघत उभी राहिली. गाडीवाला तसा तिच्यासाठीच थांबला असावा. कारण तिने फोन केल्यावर तो लगेचच आला तिला न्यायला.
त्यांचा नेहमीचा ओळखीचा माणूस होता तो.
मिसळपाव
आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !
चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.