हेमंत
सप्टेंबर जाउन ऑक्टोबर येतो न येतो तोच थंडी जाणवायला लागली आहे. थोड्याच दिवसांत घराबाहेर फिरायला जाणं मुश्किल होइल. पण काल आमचे ग्रह एकंदरीत बरे असावेत. काल बर्याच दिवसानी थोडा निवांत वेळ मिळाला होता, आणि मुख्य म्हणजे थंडी बेताची होती. ऑफिसमधून घरी येतानाच ठरवलं की आजचा दिवस फुकट घालवायचा नाही . घरी आल्या आल्या मुलाला व हीला घेउन बाहेर पडलो. (ऑफिसमधुन येउन चहा पिउन, खाउन मग जाउया म्हटलं की निघे-निघेपर्यंत काळोख पडतो हा मागच्या वेळेचा अनुभव होता.) "हेरिटेज पार्कमधे जाउया" छोट्याची फर्माईश आली. आणि पडत्या फळाची आज्ञा मानून गाडी त्यादिशेला वळवली.
मिसळपाव
सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.