धोंडू आणि धोबंग
एका अज्ञात ठीकाणी खलबतं चालली असतात-
मलईखा पोरा:
छैया छैया करून करून मी नाच नाच नाचून दमले गो बाई. नंतर हे बेबी, ते बेबी, घे बेबी, दे बेबी केले. मग हाऊस फुल्ल झाले. पण म्हणावेसे यश मिळत नाही आहे मला.
अर्रर्र बास खान:
आरं आरं आता बास की. काय हे अभद्र बोलतेस! माझ्या डोस्क्यात भन्नाट आयडीया आहे. ती आपण प्रत्यक्षात उतरवू या.
मसल्स खान:
हॅल्लो ब्रदर! सांग ना मला सुद्धा ती आयडीया. मी पण पार्टनर मध्ये शरिराचे सगळे सिक्स पॅक अॅबचे पार्ट पार्ट दाखवले. "नर" असल्याचा फायदा घेवून मसल्स चे "पार्ट" दाखवून पार्टनर चित्रपट केला.
मग मी अनेकांना "वान्टेड" होतो.
मिसळपाव
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट.
चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.