Skip to main content

विरंगुळा

आपली वैशालीतली भेट

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/09/2010 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादिवशी रवीवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, फर्ग्युसन समोरच्या वैशालीत. तू अमेरीकेहून नुकताच परतला होतास. बघण्याचा कर्यक्रम मोठ्या माणसांबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट. त्या रात्री अधीरतेनी, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता पोशाख घालायचा, त्यावर कोणते डूल घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला. तू जरी अमेरीकेत रुळलेला असलास तरी मी पहील्या भेटीत स्लीव्हलेस घालणं तुला कितपत रुचेल याबाबत मी साशंकच होते त्यामुळे ते रद्दबातल झालं. माझ्याकडे सुंदर शुभ्र पांढरा पोशाख होता पण अतिशुचितेचा काकूबाई रंग म्हणून त्यावर काट मारली गेली.

स्टेपनीची गरज

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 13/09/2010 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की. स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे.

पत्र

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अबक, तुला नवल वाटेल मी तुला अचानक हे पत्र लिहीत आहे म्हणून परंतु मला माझ्या भावना कागदावर उतरवणं आवश्यक बाब वाटली. कोणतही नातं हे तुमच्या जीवनात विशिष्ट हेतू, ध्येय घेऊन येतं आणि तो हेतू साध्य झाल्यावरच ते अनंतात विलीन होतं यावर माझा विश्वास आहे. तुझं नेहेमीचं मिष्कील हसू हसलास ना? नाही रे हे घोकंपट्टी केलेलं पुस्तकी वाक्य नाही. हा तर माझा स्वानुभव आहे. मला जाणवलेलं सत्य आहे हे. आपलं नातं या सत्याला अपवाद कसं असेल? आपल्यामधे तुला परस्यू मी केलं. मी तुला भेटत राहीले वारंवार, इमेल पाठवल्या, या निमित्ताने तर कधी त्या निमित्ताने मैत्री वाढविण्याचा प्रयत्न केला.

माझ्या बागेतील फुले

लेखक जागु यांनी बुधवार, 08/09/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
हा आहे सोनटक्का. ह्याचे मुळ आल्यासारखे असते. एक रोपटे किंवा मुळ लावले तरी ह्याच्या बाजुला त्याची पिल्ले भराभर तयार होतात. मोहक सुगंधाने सोनटक्का स्वतःकडे आकर्षीत करुन घेतो. बाजारात पानात बाधुंन ह्याची फुले विकायला येतात पण बरेचदा ही अर्धवट उमललेलीच दिसतात. सोनटक्क्यामधे पिवळा रंगही असतो. पिवळ्या रंगाचे फुल आकाराने थोडे छोटे असते. हा आहे डेलीया माझ्या बागेतील नविनच पाहूणा. आमच्या जवळच्याच नर्सरीतुन घेतला. ह्यामध्ये मला पिवळा किरमिजी रंगही दिसला.

भर पावसात खंडाळ्याच्या घाटात...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीपासुन पावसाने धुमाकुळ घातलेला. खरेतर कालच म्हणजे शनीवारीच कुठेतरी छान कोकणसाईडला बाईक काढायची आणि मनसोक्त भटकायचे असा आमचा बेत होता. पण अस्मादिक नुकतेच मलेरियाच्या भेटीला जावुन आल्याने सौभाग्यवती भर पावसात बाहेर पडायला तयार नव्हत्या. शनिवारची संध्याकाळ त्या वादावादीतच गेली आणि रवीवारी सकाळी ... "ठिक आहे, चल जावूया कुठेतरी! पण पावसात फार भिजायचे नाही, रेनकोट घालूनच निघायचे!" अशा सशर्त सहमतीनंतर रवीवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान आम्ही घर सोडले. पाऊस जवळ जवळ नव्हताच, त्यामुळे रेनकोट (विंडशिटर) बॅगेतच होते. बाईक काढली आणि पनवेलच्या मार्गाला लागलो.

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे.

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे.

आपणाला दुसर्‍याचा नवरा आवडतो का?

लेखक भीडस्त यांनी रविवार, 05/09/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर खूप विनोदी चर्चा चालू आहेत. त्यात गंभीर म्हणा विचारप्रवर्तक म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी आमचे बायकोबरोबर (नेहमीप्रमाणे) परत एकदा भांडण झाले. आज सकाळी मिपावर आलो आणि हा विषय सुचला विषयाचे नाव आहे.

झुंजु-मुंजू

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 05/09/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आई....! ए, आऽई!! लेकीची दबकी हांक कानावर आली तसा मंगलाबाईंचा डोळा उघडला पण पुरती जाग आली नव्हती. ’सकाळ झाली की काय!’ म्हणून नजर खिडकीवरल्या झरोक्याकडे गेली तो अजून काळोख गडदच होता. सरत्या ग्रीष्मातली रात्र तशी फार मोठी नसली तरी उजाडायला एखादी अजून घटका तरी जायला हवी होती. हे असं काहीसं भान जाणवतं न जाणवतं तोच पुन्हा एक दबकी हाक! पण या वेळी कणभर कण्हल्यासारखी. पुढ्यातच झोपलेल्या लेकीच्या पाठीवर त्यांचा हात गेला आणि तसाच तो आभावितपणे तिच्या कपाळावरही गेला. "काय गं? काय होतंय?" "आईऽऽ, पोऽऽऽट...." "दुखतंय?" "हंऽ!!" "बरं.