विरंगुळा
आपणाला दुसर्याचा व्यवसाय आवडतो का?
नमस्कार मंडळी,
सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय.
बर्याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्याच्या बायकोसारखा दुसर्याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा.
आपणही विचार मांडा.
अलविदा त्या रुम मालकांना
कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील. बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली.
माझे रिकामपणाचे उद्योग--पेपर क्विलिंग!!!!
आमचे आधीचे रिकामपणाचे उद्योगः
१. ग्लासपेंटिग
२. बुकमार्क्स
सुबक ठेंगणी जपानहून आली. यायच्या आधीच तिने माझ्यासाठी विणलेला एक छानसा रूमाल घेतलाय म्हणून सांगितले होते. पण भेटली, तेव्हा तिने नुसता एकच रूमाल न देता एक आख्खी पेपर बॅगच दिली. आणि मी आतल्या भेटवस्तू पाहायचं सोडून बॅगकडेच पाहात राहिले. कागदाच्या पातळ पट्ट्या नीट्सपणे कापलेल्या. आणि त्या पट्ट्यांची सुंदरशी पिवळी-तांबडी, पिवळी-निळसर फुले, हिरवीगार पाने अशी मस्त नक्षी. प्रत्येक फूल दिमाखात...
धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.
थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय.
दंगल-ए-खास
''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....''
माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता.
गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची!
छोटेखानी लेखांची मालिका - इथे शब्द संपतात...१
दहीभात..!
इथे शब्द संपातात!
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..माझा दोस्त युजिनी
यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत.
लगी रहो मुन्नीबाई!
काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं.
तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती...
...
दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती...
देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात.
मिसळपाव