बहुगुणी वडे
नमस्कार! आज आपण बहुगुणी वडे तयार करून पाहाणार आहोत. ही पाककृती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवरच या पाककृतीला हात घालावा. ही पाककृती फसल्याने पट्टीच्या खवय्यांनाही बध्दकोष्ट, अजीर्ण, कफ आणि बर्याच वेळा वात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाणार्यांना उबळ, उलटी, मळमळ, अंगाचा दाह, माथेशूळ उठणे इत्यादी त्रास झाल्यास तात्काळ पाककृती गुंडाळावी आणि काढता पाय घ्यावा - त्यांच्या पचनशक्तीला दोष देऊ नये आणि समजूत काढण्याच्या तर बिलकुल भानगडीत पडू नये.
मिसळपाव