माझी हॉस्पीटल भरती
त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला.
तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय?" अशी पॄच्छा केली. त्यांचीही चुक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बरचसा इती सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला.
मिसळपाव