एक फिरकी अशीही!
कोण कोणाची, कधी, कशी फिरकी घेईल ह्याचा नेम नसतो! आमच्या पूर्वीच्या घराच्या मालकीणबाई ह्या एरवी अतिशय चलाख, लबाड म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांना कोणी सहसा उल्लू बनवू शकायचे नाही. पण एकदा त्यांच्या मैत्रिणीनेच त्यांची कशी फिरकी घेतली ह्याचा हा एक भारी व विनोदी किस्सा :
मालकीणबाईंच्या थोरल्या लेकाचे लग्न झाले. भरपूर स्थळे आधी नाकारून झालेली. मालकीणबाईंना त्यांच्या लेकासाठी सर्वगुणसंपन्न आणि मुख्य म्हणजे श्रीमंताघरची सून हवी होती. मिळाली ती सून थोरा-मोठ्या घरची. तिचं माहेर अतिशय गर्भश्रीमंत, मुंबईच्या उच्चभ्रू वर्गातले. माहेरी खानदानी पण आधुनिक वातावरण.
मिसळपाव