द नवाब ऑफ नजफ़गढ़!
"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!"
पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला.
मिसळपाव

आम्रपालीचा जन्म कोठे झाला, तिचे माता-पिता कोण हे कायम गूढच राहिले. वैशाली नगरीच्या राजप्रासादात ती एका आम्रतरूपाशी ठेवलेली सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली!
इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली.