Skip to main content

विरंगुळा

एका तळ्यात होती .......

लेखक सुनील यांनी सोमवार, 12/10/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
कमळे फुले सुरेख ....... अलिबागजवळील कुरुळ हे गाव तेथिल कमळाच्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. परवाच त्या परिसरात गेलो असता पाहिले, तर तळे कमळांनी भरून गेले होते.

सकाळच्या वेब एडिशनवर माझा लेख (सुधारित आवृत्ती)

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 08/10/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खान यांच्या पत्र प्रसिद्धी मागचे कारण काय? (माझ्या आधीच्या लेखाची सुधारित आवृत्ती आज दै.’’सकाळ’न’’आपल्या वेब एडिशनवर अपलोड केलेली आहे) दुवा: http://beta.esakal.com/2009/10/08121050/pailteer-dr-abdul-qadeer-khan.h… (आपली मते थेट सकाळच्या वेबसाईटवर खाली दिलेल्या चौकटीतच चढवावी ही विनंती.) २००३ साली आपली डच पत्नी हेनीला लिहिलेल्या पत्राचा मजकूर ब्रिटिश पत्रकार सायमन हेंडरसन यांच्या हातात २००७ साली आला, पण त्या पत्रातील मजकुरावर त्यांनी लेख लिहिला जवळ-जवळ दोन वर्षांनी!

गीर्वाणवाणी आणि भाषा इंडोनेशिया (आज अनेक नवीन शब्द घातले आहेत)

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 07/10/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनेक नवीन शब्द घालून हा लेख मी मुळाक्षरांनुसार पुनर्रचित करून (in alphabetical order) पुन्हा लिहिला आहे. जे नवीन शब्द आहेत ते ठळक अक्षरात आहेत. वाचा तर..... -------------------------------------------------- मी जेंव्हा इंडोनेशियाला आलो तेंव्हां येथील एकंदरीत संस्कृतीवरील हिंदु धर्माची छाप व यांच्या भाषेतली संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल पाहून थक्क झालो.

मात्र रात्रीची गोष्ट भाग ६

लेखक दशानन यांनी मंगळवार, 06/10/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मात्र रात्रीची गोष्ट भाग ५ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (पाचवा पेग होवुन गेला आहे, समिक्षा सुरू आहे अशी स्वयंभु अवस्था.... अशातच पेग ६ ) मी - त्या हाटिलात गेला होतास का येवढ्यात... तो- नाय बा ! आपल्याला तिकडं झेपत नाही मी - का ? तो - अरे आपण साला मनात आला ते ओकणार.. तिकडे ओकायचे तर मनातल्या मनातच मी - अन तिकडे काय मनातले बोलत नाही काय ? तो - बोलतात की. मनातले बोलतात पण सगळेच नाही. बोलतात कमी आठ्या जास्त... मी -म्हणजे? तो - अरे इथे कसे आपण डिश आवडली तर जोरदार टाळी वाजवतो, झक्कास करुन आवाज देतो, अऽऽऽब्ब करुन ढेकर देतो. मी - हो...

`बाल'हट्ट

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 30/09/2009 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.'' आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती. मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली.

दशावतार

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 28/09/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले. सूरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अ‍ॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो.