Skip to main content

विरंगुळा

आंतरराष्ट्रीय सौजन्य!!!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 08/06/2009 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चायनीज माणसाने सॉल्लीड आक्षेप घेतला (त्याला आपण 'ली' म्हणू). सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न.

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

लेखक ॐकार यांनी रविवार, 07/06/2009 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

क्रिप्टीकप्रतिपालक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 02/06/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी १ वाजता फोन खणाणला. मास्तरांचा होता. खरी तर ही मास्तरांची वामकुक्षीची नाहितर शेतसारा वसुल करायची वेळ, फोन उचलला तर पलीकडे काकू. "हे कसे तरी करत आहेत रे परा" काकू. आमचा अंदाज खरा ठरला म्हणायचे,मिपावरच्या एका लेखातील प्रतिसाद वाचुन असे काहीतरी होणार ह्याची खात्री होतीच. एकंदरीत माहीती अशी मिळाली. मास्तर प्रत्येक वाक्यात 'सर्वप्रथम' हा शब्द वापरत होते. त्यातल्यात्यात सर्वप्रथम शब्दानेच वाक्याची सुरुवात करायला बघत होते. दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले) मास्तरच्या फोन बुक मधे दोनच मिपाकरांचे फोन होते. १. परा २.

माझा रिकामपणाचा उद्योग.... १ ग्लास पेंटिग!!!

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 01/06/2009 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा हॉटेलात जेवायला गेल्यावर सहज वरती नजर गेली...टेबलाच्या वर काचेवरती पेंटिग केलेले छान झुंबर होते.. अगदी वेगळं नि झक्कास दिसत होतं.. सोबतची मैत्रिण म्हणाली.. काचेचे तुकडे एकमेकांना जोडून जोड दिलेला भाग सोनेरी वा काळ्या रंगाने रंगवतात.... खूप नाजूक नि बर्‍यापैकी महाग प्रकरण असतं ते... नंतर विसरूनही गेले मी ते... त्यानंतर एकदा दिव्यांच्या दुकानात गेले असताना पुन्हा तसंच एक झुंबर दिसलं... आता मात्र जवळून पाहता आलं.. यावेळी ते जरा जास्तच क्लिक झालं.. घरी गेल्या गेल्या जालावर शोध घेतला.. नि अशी चित्रे शोधली... तर तिथे गंमतच होती... एकच बाऊल.. त्यावर रंगकाम केलं होतं..

कावळा आणि चिमणी

लेखक अनामिक यांनी सोमवार, 01/06/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे. (काही बदल सुचवता आले तर नक्की सुचवा).

विरह

लेखक अरुण वडुलेकर यांनी सोमवार, 01/06/2009 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या हिरव्या वनांत या जरि पानोपानी छाया ग, दृष्टि समोरी तूंच नाहि तर हिरवळ डोळां जाळी ग | सहा रसांचे स्वाद लेऊनी अमृत जरि मम पात्रीं ग, घांस द्यावया तूंच नाहि तर ठसका कंठी रुतला ग | फुलापरी ही कोमल शय्या जरी निरव या रात्री ग, स्पर्शावाचुनि मोरपिशी तव उरांत भडका उठला ग |
Taxonomy upgrade extras

"दिलाचा दिलवर भेटला..."

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 01/06/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
वाटंला डोळे जीव थकला धनी कधी हो येता घरला साजण माझ्या स्वप्नीच आला मला दिलाचा दिलवर भेटला तगमग जिवाची होतेया भारी रात सरली कधी येतेया स्वारी वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान हिच्चा नवरा शारूख खान माझा डोळाच पटकन लागला मला दिलाचा दिलवर भेटला नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान हा ठेवा मी जपून ठेवला मला दिलाचा दिलवर भेटला राती अचानक खोलीत आला मला पाहुनी दिवा मालवला..