विरंगुळा
सरप्राईज
"चल ऊठ चार वाजले. ऊठतोयेस ना?" आईच्या आवाजाने झोपेला झटकुन ऊठुन बसलो घड्यळ्यात पाहिले तर चार वाजुन गेले होते. ज्यासाठी दादर स्टेशनला जायचे आहे तोच विचार मनात. आई मला उठवुन परत झोपली मीच सांगितले तसे. 6.30 ची गाडी आहे लवकर पोहचायला हवे हे मनातच बोलुन फटाफट आंघोळ वगैरे आटपुन तयार झालो.. घड्याळ्यात पावणेपाच. चहा बनवला दुध टाकायला गेलो तर दुध नासलेले. चहा तसाच बेसीन मध्ये ओतुन चहाची तहान पाण्यावर भागवुन बाहेर पडलो.
बिल्डींगमधुन बाहेर पडलो तेव्हा दुध पोहचवणाऱ्या पोरांची धावपळ चालु होती. शेजारच्या बिल्डींगखाली पारिजातकाचे झाड आहे काही सेंकद तिथे घुटमळलो. प्राजक्तांचा सुंगध छातीत भरभरुन घेतला.
((चंपी))
चंपी
श्वान कुत्तरा निखळ जात ही भुंके सदानकदा
भुकेचे उसासे केकाटून गेले हाडूक जिव्हारी लागून मेले
रस्त्यातूनी जाताजाता काय मनाला हरखून गेले
लडबडत्या पुच्छा मागे मित्र करिती भाद्रपद चाळे..
भुंकून भुंकून दातपिसून गुरगुराटी स्वरनक्षी केली
हिंस्त्र ठसे चाव्यांचे युद्धाचे क्षण वागवती झाली
कुत्री म्हणॉनी हिणवी कोणी दगड मारी पेकाटी
जीणे जगणे लाजीरवाणे ; संसार मांडते रस्तोरस्ती
निळ्याजांभळ्या जिभा काढते हातभर पाहून पाव बिस्कुटी
रस्त्यातच फिरेन रस्त्यातच मिटेन एका चाकाखाली
क्षणी एका होत्याची नव्हती होईन ; शांत आकांत होईल
हडुत हुडूत मधुनी सुटेन मी धाकटी चंपी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव