((नेहेमीच...तुझ्यामुळे))
'नेहेमीच ... तुझ्यामुळे' ही बेसनलाडवाची कैफियत वाचून अगदी भरुन आले, ऊर्मी बराचवेळ दाबून ठेवली पण मळमळ थांबेना तेव्हा शेवटी इथे आलोच! आदतसे मजबूर दुसरे काय?! ;)
वृत्तात 'भांग'
अर्थास 'टांग'
नेहमीच ... तुझ्यामुळे
कवितेत घोळ
घालावी खोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
कमरेत खूर
डोळ्यात पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
सगळे कसे
(फसले असे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
शब्दांची लाच
शब्दांना लाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
पहिलाच 'बार'
पहिलीच 'धार'
नेहमीच ... तुझ्यामुळे
वाचून झीट
विडंबन धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
कवितेची भेट
'चतुरंग' थेट
नेहमीच ... तुझ्यामुळे
चतुरंग
Taxonomy upgrade extras
मिसळपाव

