विरंगुळा
बॉलिवूड मधले हिरो - भाग
चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला.
माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते.
राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा..
बुद्धीबळ खेळणारे यंत्र!
आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल.
बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले!
शिल्पकार गुरू आणि मास्तरांची शिल्पकला..
झालं काय, आमच्या एका नाटकासाठी एक नाटकात काम करणार्या कलाकारासारखा दिसणारा पुतळा हवा होता... आता हे म्हणजे जरा अवघडच झालं.. चित्राबित्राचं जमलं असतं पण शिल्प तेही हुबेहूब तसं दिसणारं म्हणजे काय करावं बरं, अशा विचारातच होतो..तेव्हा कळलं , आपल्याच भागात एक शिल्पकार राहतात, ते हे करून देऊ शकतील...
ते शाडूच्या मातीपासून प्लास्टर मोल्डिंग पद्धतीने प्लास्टर शिल्प बनवणार होते.. पण त्यांना एका असिस्टंटची गरज होती.. मग काय हो, मी तर आनंदानं बनलो त्यांचा असिस्टंट...
( असल्या गोष्टी इतर कुठे आम्हाला लवकर शिकायला मिळणार?)...
. ..
हे आमचे गुरू शिल्पकार चंद्रशेखर जोशी...
खाना खजाना
खाना खजाना
आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!)
टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही.
(येऊ कसा तुमच्यात मी)
योगेश वैद्य यांची 'येऊ कसा तुमच्यात मी' ही कैफियत ऐकली आणि एकदम वेगळीच तक्रार डोक्यात रुंजी घालून गेली! ;)
घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी?
तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी?
आरशात मावे न मी जाऊ कुठे, जाऊ कसा?
संपेचना हे दोंद, का एवढा बहरात मी?
आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले
एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी
वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा?
पोट येते आधी जरासे आणि त्या पश्चात मी
'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी
भेट घ्याया येत होतो अडकलो 'केकात' मी
चतुरंग
बेळगावी मांडे
प्रथमच मी बेळगावात गेलो. एका खानावळीत (फारशी वळवळ नव्हती.तशी ती रिकामीच होती) गेलो.
बाके नव्हती. कसाबसा खाली बसलो. ओथंबलेला (चारी बाजूने) आचारी एकदम म्हणाला, "मांडेऽऽ".
मला कळेचना. नेमकी काय चूक झाली.
पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ".
"असं होय..", म्हणून मी मांडी घालून बसलो.
तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ".
मला वाटले बेळगावात सेल्फ सर्विस असावी. म्हणून मी स्वतःच उठून ताट-वाटी वगैरे घेतले.
तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". यावेळी इतक्या जोरात म्हणाला की,
मी घाबरून काहीतरी अर्थ लावून ताट वगैरे सर्व मांडीवर ठेवले.
जा, उडुनी जा पाखरा
झाडावरचा इवलासा तांबूस तपकिरी पक्षी नजरेस पडताच मी दबक्या पावलांनी अलगद त्या दिशेने सरकलो व झुडुपांमध्ये बसकण मारत लपत छपत किरण साधला. कळ दाबणार इतक्यात त्या चिमण्या जीवाला चाहुल लागली. माणूस हा प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ज्ञान त्याला उपजतच असावे.
मिसळपाव