Skip to main content

विरंगुळा

अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी

लेखक aanandinee यांनी बुधवार, 17/05/2017 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं.

इमान...भाग ४

लेखक चिनार यांनी मंगळवार, 16/05/2017 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या तीन भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39750 http://www.misalpav.com/node/39761 http://www.misalpav.com/node/39789 "उल्लू बनवतं का बे सायच्या मले?" गब्ब्यांन बबन्याच्या कानाखाली मारली. "काय झालं बे? काऊन मारतं मले? "इमानाची वेळ काय सांगतली मले तू?" "सात वाजता हाय ना सायंकाळच्या." "सात वाजता?" "हो मंग." "मंग हे काय लिहेल हाय इथं? एकोणीस वाजता? घडाळ्यात एकोणीस वाजताना तुया बापानं पायलते का कधी?" "अबे च्यामायबीन!!

इमान...भाग ३

लेखक चिनार यांनी सोमवार, 15/05/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या दोन भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39750 http://www.misalpav.com/node/39761 झालं ना !! गब्ब्या फ्यामिलीले घेऊन इमानात जाणार हे गोष्ट साऱ्या गावात पसरली.

कथुकल्या ७

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 13/05/2017 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
१ . मायावी माझ्या स्वागताला ना पाचूंनी मढलेला दरवाजा होता, ना हिरेमाणकांसारख्या लखलखणाऱ्या अप्सरा. ज्या दगडी दरवाजातून मी आत आलो होतो त्यावरून स्पष्ट होत होतं की ही गुहा आहे. चारीबाजूंनी काळ्याशार, उंचच उंच दगडी भिंती होत्या. गुहा निर्जीव नसून जिवंत आहे अशी अनुभूती होत होती. कुबट, कोंदट वासाने जेरीस आणलं होतं. मला माहीत होतं की मी कुठे आलोय. तेच ठिकाण ज्याला जगातले सगळ्या धर्माचे लोक घाबरतात. ज्याच्या भितीमुळे बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा जन्म झालाय. नक्कीच मी नरकात आलो होतो.

इमान....भाग २

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 12/05/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक http://www.misalpav.com/node/39750 इकडं गब्ब्यांन पैश्याची जुळवाजुळव सुरु केलती. इमानात बसाची त्याची लय इच्छा व्हती. त्यानं बायकोला न सांगता गावच्या बँकेत एक खातं ओपन केलंत. जमनं तसे पैसे टाकत जाय तो त्याच्यात. गब्ब्यांन गपचिप जाऊन पैसे काढून आनले. अन तिकडं बबन्यानं तिकीटाची जुगाडबाजी चालू केली. बबन्या एक नंबरचा फकाल्या मानुस. त्येच्या पोटात काही रायते का? अन तसपनं खेड्यात कोनती गोष्ट लपून रायते ? येक दिवस बबन्यानं गब्ब्याच्या हातात तिकीट टिकवलं... "घे बे सायच्या.जमवला तुया जुगाड" "काय सांगतं? येक नंबर काम झालं ना हे.

इमान... भाग १

लेखक चिनार यांनी गुरुवार, 11/05/2017 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
"आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या." डोस्क्यावरून उडणाऱ्या इमानाकडं पाहत गब्ब्या म्हनाला. "येडा झाला का बे तू..तुले कोन घीन का इमानात?" "काऊन? तिकीट काडल्यावर तं घ्याच लागीन नं त्याईले." "असं नाय घेत बे कोनाले. इंग्लिश लोकं असतेत तिथं." "म्हंजे?? अन तुले काय म्हायती बे?? तिकिट काडून यष्टयीत बसतो तसं इमानात बसाचं." "यष्टयीसारखं नसते बे..यष्टयीत नीरा कोंबतेत लोकाईले..हा त्याच्या उरावर..थो दुसऱ्याच्या मांडीत..तीन शिटावर सहा-सहा लोकं बसतेत. इमानात जेवढ्या शिटा तेव्हढेच माणसं असते. म्हणून तर आपल्यासारख्याले घेत नाही आतमध्ये.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 10/05/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती.

वऱ्हाडी स्मार्ट सून बाई....

लेखक दिव्य चक्षु.. यांनी मंगळवार, 09/05/2017 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
विनंती: एकच भाषा असेल तरी दोन प्रांतांमधल्या बोलीभाषेच्या फरकामुळे होणारी गंमत आणि गैरसमज यातून निर्माण झालेला विनोद अशा दृष्टिकोनातूनच या माझ्या पहिल्याच लेखाकडे पहावे पुण्यातल्या मुलगा अट्टल विदर्भातल्या मुलीच्या प्रेमात पडला, आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले,मुलाच्या घरचे ह्या बातमीने हैराण झाले, अरे पण तू असे कसे करू शकतोस? मुलाने आपला निर्णय जाहीर केला लग्न करेन तर मालू शी नाहीतर संन्याशी, त्याचे बाबा जोरात ओरडले अरे तू सन्या शी पण लग्न करायला तयार आहेस? , मग मालूशीच लग्न कराचे का म्हणतोस ?

लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.

लेखक सचिन काळे यांनी शनिवार, 06/05/2017 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं.

कथुकल्या ६ (गूढ, रहस्य विशेष)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 06/05/2017 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
१. शेरलॉक अन फाशीचा दोर टॉक... टॉक… टॉक… टॉक काळ क्षणाक्षणाला पुढे सरकत होता, मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येत होता. सेकंदकाटा आपल्या काळजावर आघात करतोय असं शेरलॉकला वाटत होतं. अर्थात याची त्याला सवय होती. स्कॉटलंड यार्ड त्याला बऱ्याचदा उशीराच बोलवायची. कित्येक केसेस त्याने शेवटच्या काही क्षणांत सोडवल्या होत्या. आजही तसं होऊ शकलं असतं. त्याने डोळे उघडून समोर पाहिलं. पंचवीस वर्षांचा तरुण मुलगा त्याच्याकडे आशेने बघत होता. त्याच्या डोक्यावर फाशीचा दोर लटकत होता. कसायाने त्याचे दोन्ही हात समोर घेऊन चामड्याच्या पट्ट्याने बांधायला सुरुवात केली.