ट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....
हाईट हाऊसच्या दारावर पोस्टमनने बेल वाजवली तसं मेलानिया ट्रम्प बाईनी भाकरी थापता थापता कडी काढून दार उघडलं. पोस्टमन कडून घेतलेलं पत्र चुलीपुढं बनियन लुंगी लावून गरम भाकरी अन पिटलं खात बसलेल्या डोनाल्ड तात्यांच्या हातात दिलं. डोळे मिचमिच करीत आणि तोंडातला भाकरीचा घास गिळत गिळत ट्रम्प तात्यानी एका दमात ते वाचून काढलं.
“काय वं काय लिवलय! जरा मोठ्यानं वाचून दाखवा की?” मेलानिया बाईनी परातीत थापलेली भाकरी तव्यात टाकत प्रश्न केला.
“मुंबई मधून पत्र आलय! निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून!” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प तात्या बायकोकडं बघून म्हणाले.
मिसळपाव