फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !
आज काय घडले...
फाल्गुन व. १४
ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !
शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
यांचे निधन झाले.
हायस्कूलमध्ये असल्यापासूनच यांच्या बहुश्रुतपणामुळे शिक्षक यांना 'एन्सायक्लोपीडिया' असे म्हणत. येथील शिक्षणक्रम अपुरा असतांनाच ते १९०६ मध्ये अमोरिकेस गेले. आणि तेथील कार्नेल विद्यापीठांत समाजशास्त्राचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि थोड्याच अवधींत बी. ए., एम् . ए., पीएच. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या.
मिसळपाव
शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ.
शके १६५० च्या फाल्गुन व. १२ रोजी पहिल्या बाजीरावाने पालखेड येथे निजामाचा संपूर्ण मोड केला.
या वेळी निजामुल्मुल्काने दक्षिणेत आपले बस्तान नीटपणे बसविले होते. दिल्लीच्या बादशहापासून दक्षिणच्या सहाहि सुभ्यांतून खंडणी घेण्याचा हक्क बाळाजीने मिळविला होता.
खंडेराव यांचा जन्म शके १६४५ च्या विजयादशमीस झाला. खंडोबा हे होळकरांचे दैवत असल्यामुळे मल्हाररावांनी मुलाचे नांव खंडेराव असें ठेविलें. शके १६५५ मध्ये यांचे देवी अहल्येशी लग्न झाले. अहल्याबाई व खंडेराव यांच्यांत दुर्दैवाने असावे तेवढे सख्य नव्हते.
शके १६२१ च्या फाल्गुन व. १ रोजी श्री शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव श्रीराजाराममहाराज यांचे निधन झाले.
राजारामांचा जन्म शके १६६२ मध्ये सोयराबाईच्या पोटी झाला.
निकुंमिलेकडे इंद्रजित यज्ञ करीत होता. इकडे रामाची आज्ञा घेऊन लक्ष्मण, बिभीषण, हनुमान व जांबवान हे सर्व निकुंभिलेस आले. हनुमान आणि जांबवान यांनी इंद्रजिताच्या सैन्यावर निकराचा हल्ला केला. इंद्रजिताने आपले यज्ञकर्म सोडले व रथावर आरूढ होऊन त्याने मारुतीवर बाणाचा वर्षाव सुरूं केला.
शके १७१६ च्या फाल्गुन व. ५ रोजी म्हणजे रंगपंचमीला मराठे आणि निजाम यांचा खर्डे येथे इतिहासप्रसिद्ध सामना होऊन निजामाचा संपूर्ण पराभव झाला.
मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा हा प्रसंग आहे. खासा विजय अजूनहि मराठ्यांच्या बाहूंना स्फुरण चढवीत असतो.
शके १५२१ विकारी नाम संवत्सरी फाल्गुन व.