आज काय घडले फाल्गुन शु. ९ शिवरायांचे आग्न्यास प्रयाण !
शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनी रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी राजे, कांहीं सोबती व.चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तरेस आग्याकडे प्रयाण केले.
जयसिंहाच्या मध्यस्थीने शिवाजी राजे -औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता.
मिसळपाव
शके १६५१ च्या माध शु. ३ रोजी पुणे येथे पहिल्या बाजीरावाच्या कारकीर्दीत प्रसिद्ध अशा शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
बाजीराव मधून मधून पुण्यास येत असे तेव्हा त्याचा मुक्काम कसब्यांत धडफळे यांच्या वाड्यांत असे.-" शके १६५० मध्ये पुरातन नदीकिनारा कोटकिल्ले, हिसार मोगलाई ठाणे होते.
शके १७५३ च्या माघ शु. २ रोजी जेजुरीच्या खंडोबाचा प्रसिद्ध भक्त आणि विख्यात क्रांतिकारक रामोशी उमाजी नाईक यांस फाशी दिली गेली
शके १७१३ मध्ये पुरंदर शेजारच्या भिवंडी गांवी उमाजीचा जन्म झाला. सन १८०२ च्या वसईच्या तहानंतर पेशवे आणि रामोशी मंडळी यांचे बिनसले. रामोशांची वतने जप्त झाली.
माघ शु. १ या दिवशी श्रीरामचंद्रांनी राजधर्मास अनुसरून व बिभीषणाची संमति घेऊन सामोपचाराचे शेवटचे बोलणे करण्यासाठी अंगदास रावणाकडे पाठविलें.
लंकेभोवती वेढा कायम केल्यावर रामचंद्र आपल्या सहकाऱ्यांसह सुवेलपर्वतावर चढले व तेथून त्यांनी लंकेचे निरीक्षण केले.
शके १८३२ च्या पौष व. ३० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल लागून त्यांना दुसरी जन्मठेप-काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
मायदेशी सावरकर आले ते नाशिकच्या तुरुंगांतच अटकेत राहिले. जॅक्सनच्या खुनामुळे सरकार बिथरून गेले होते. सेशल ट्रिब्यूनलपुढे खटल्याचे काम सुरू झाले.
शके १८६२ च्या पौष व. १४ रोजी वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला.
१६ जानेवारीपासून मौन धारण करून ते आपल्या खोलीत चिंतनात मग्न झालेले होते. व्याघ्राजिनावर बसून 'गीता', 'चंडी' व इतर धर्मग्रंथांचे पारायण करीत ते संन्यस्त वृत्तीने वागत होते. दि.