मांगी-तुंगी
सटाणा- पिंपळनेर ह्या ऊत्तर महाराष्ट्रातील प्रचंड निसर्गरम्य स्थळ मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगर ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो.
मिसळपाव
शके १२७० च्या पौष शु. ५ रोजी मनुष्यजातीचा शत्रु म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूरलंग याने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली जिकली !
तैमूरलंग जातीने तुर्क असून त्याच्या ठिकाणी तीव्र बुद्धि व अचाट धाडस या गुणांचे वास्तव्य होते. पूर्वायुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देऊन हा ऐश्वर्यास चढला.
पौष शु. ४ या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ विभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली.
लंकेला आग लावून मारुति गेल्यानंतर रावण पुढे काय करावें या विचारांत असतां बिभोषणाने सुचविले- "राम धर्माने लढत आहे.
शके १६८२ च्या पौष शु. ३ रोजी राघोबादादा यांनी निजामशी उरळी येथे अप्रयोजक असा तह केला.
पानपतच्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड संहार झाला आणि कलिपुरुष राघोबादादा कचखाऊ निघाले. ही संधि निजामाने चांगलीच साधली. त्याने कारवाया सुरू करून मराठ्यांचे मुलूख घेण्यास आरंभ केला. 'अविंधानें लबाडी केली.
शके १८२९ च्या पौष शु. १ रोजी महाराष्ट्रांतील सुधारक व प्रसिद्ध नवविचारप्रवर्तक राजारामशास्त्री भागवत यांचे निधन झाले.
तीन वर्षे मेडिकल कॉलेजात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जुन्या शास्त्यांजवळ पांच-सहा वर्षे संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर ते सेंट झेवियर कॉलेजमध्ये संस्कृत शिकवू लागले.
शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले.
दुर्योधन अनाथ व असहाय होऊन घोड्यावरून फिरत होता. रणभूमीपासून एक कोस अंतरावर एक सरोवर होते. त्या सरोवरांत मायेने पाण्याचे स्तंभन करून दुर्योधन विश्रांति घेत स्वस्थ राहिला.
तेराव्या शतकात परमार्थाचे पीक सर्वत्र सोळा आणे आलेले होते. जोगा परमानंद तेली जातीत निर्माण झाले. परमानंद हे यांच्या गुरूचे नांव आणि जोगा हे यांचे स्वतःचे नांव. हे बार्शीस रहात असत. तेथे असलेल्या भगवानाच्या मंदिराकडे ते रोज गीतेतिल एक श्लोक म्हणत, नमस्कार घालीत जात असत.
आज काय घडले...
मार्गशीर्ष व. १३
धनुवीर कर्ण याचा वध !
शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजी पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला.
कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध अत्यंत निकराचे झाले.