Skip to main content

इतिहास

जर्नी इस द रिवॉर्ड

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/06/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.

मार्तंड जोशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 05/06/2019 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
मार्तंड जोशी हे एक विद्वान ज्योतिषी होते. एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना एकदा त्यांना, त्या काळी एका अंत्यज समजल्या जाणार्‍याच्या झोपडीत आसरा घ्यावा लागला. घरात एक म्हातारी आणि तिची मुलगी राहत असे. आपण घरी वेळेवर पोहोचू शकत नाही या विचाराने जोशी अस्वस्थ होते. म्हातारीने कारण विचारले. त्यांनी सांगितले की आजच्या दिवशी ज्या स्त्रीची गर्भधारणा होईल तिला होणारा पुत्र हा मोठा ज्योतिषी होणार आहे; मी जंगलात अडकल्यामुळे ही सुवर्णसंधी हुकणार आहे. म्हातारीने त्यांना आपल्या मुलीबरोबर रात्र घालवायची परवानगी दिली. मार्तंड जोशी यांना त्या अंत्यज मुलीपासून पुत्र न होता कन्या झाल्याने जोशी फार उदास झाले.

राजा विक्रमादित्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
० उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली. . ती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली.

|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||

लेखक मनो यांनी रविवार, 26/05/2019 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील. या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो.

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 19/05/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.

आणि बुद्ध हसला !

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 18/05/2019 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ ची सकाळ आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सुरू असलेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला आणि एक उद्घोषणा केली गेली. कृपया एक महत्त्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें।. "आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है।" ७ सप्टेंबर १९७२ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरला भेट दिली, त्या भेटींत गांधींनी पिसफूल न्यूक्लियर डिव्हाईस म्हणजेच PNE तयार करण्यासाठी परवानगी दिली आणि हसऱ्या बुद्धाचा प्रवास सुरु झाला. पण हे अगदी अलीकडचं नक्कीच नव्हतं.

औरंगजेबाच्या (शिल्लक) सहिष्णूतेचे रहस्य

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 14/05/2019 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाने शिरच्छेद केलेल्या सरमद कशिद बद्दल लिहिलेल्या प्रतिसादात, मध्ययुगीन (छ. शिवाजी कालीन) इतिहासाचे अभ्यासक मनो यांचाही अनुषंगिक विषयावर बर्‍यापैकी समतोल प्रतिसाद आला.

‘सटाणा तालुका बागलाण’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/05/2019 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे सटाणा हे विंचूर - प्रकाशा महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेलं असून 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 37,716 इतकी आहे. महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील (नाशिकपासून 90 किमी ईशान्य दिशेला) बागलाण तालुका म्हणजेच सटाणा तालुका. सटाणा हे तालुक्याचं गाव. सटाण्यापासून वायव्य दिशेला गुजराथ राज्यातील डांग भागाची सीमा फक्त0 40 किमी अंतरावर आहे. गावाजवळून वायव्य- आग्नेय या दिशेने आरम नावाची लहान नदी वाहते. (म्हणजे पूर्वी वहात होती. आता खूप पाऊस झाला तर पावसाळ्यात तात्पुरती वहाते.) सटाण्यापासून दहा किमी पुढे गिरणा नावाच्या नदीशी आरमचा संगम होतो.

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/04/2019 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

सैनिक आणि शोधक

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 23/04/2019 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
*मानसिकता : सैनिक आणि शोधक* जगात 2 तर्हेची मानसिकता असलेली माणसं पहायला मिळतात. तो फरक सांगणं सोपं व्हावं म्हणून एक उदाहरण किंवा रूपक मांडतो. सैन्याची वर्गवारी अनेक प्रकारे होऊ शकते. मला जे सांगायचंय त्यासाठी ती वर्गवारी सैनिक आणि शोधक (स्काऊट). सैनिक संरक्षण आणि आक्रमण या दोन्हीसाठी उपयोगी असतो. तर शोधक त्याला माहिती पुरवतो. सैनिक प्रत्यक्ष लढतो तर शोधक ब्रिजेस कुठे आहेत, जंगल कस आहे, जिथे हल्ला होणार तिथले लोक मदत करणारे आहेत का, अडचणी काय असणार, सोयीच्या गोष्टी कोणत्या वगैरे माहिती काढतो आणि सैन्याला पुरवतो. सैन्याला सैनिक आणि शोधक दोघांची गरज असते. ही रूपकं आता इतिहासातून समजून घेऊ.