सब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक
तो यवन त्याच्यावर पचकन थुंकला,
याच्या डोळ्यात अंगार फुलला,
“हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली.
यवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला.
“गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला”
त्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला.
हिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला.
ठरलेल्या जागी पोचेपर्यंत तो घामाने अक्षरश: निथळत होता. त्याचे हृदया छाती फोडून बाहेर येवू पहात होते.
मिसळपाव
समुद्रामार्गे मुंबईत मच्छिमार नगराजवळ 'ते' दहाजण उतरले आणि पुढचे साठ तास मुंबई रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाली. संपूर्ण देश श्वास रोखून टीव्हीसमोर स्तब्ध उभा होता. नेमके किती अतिरेकी मुंबईत घुसलेत? कुठे कुठे हल्ले सुरु आहेत?
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!