पाकिस्तान - ११
लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले.
सीमेपासून लाहोरपर्यंतचे अंतर तेवढेच आहे जेवढे कॅनॉट प्लेस ते नोएडा. असही नाही की रस्त्यात रणगाड्यांची रांग लागलेली असते नी सैन्य त्याला ओलांडून जाऊ शकत नाही. ग्रँड ट्रंक रोडसारखा उत्कृष्ट रस्ता बनलेला आहे. पाकिस्तानने लाहोरच्या वेशीवर जुन्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था केली होती. जसे किल्ल्याच्या बाहेर एक कालवा खणणे, जेणेकरून इतर सैन्य तेथवरच थांबू शकेल.
मिसळपाव
चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”
साहजिकच तो खूप ट्रोल झाला पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण बहुतेक वेळा पाकिस्तानला जिंकताना पाहिले. 2004 पूर्वी भारत पाकिस्तानमध्ये एक सिरीजच काय एक कसोटी सामनाही जिंकू शकला नव्हता. गावस्कर आणि अझरुद्दीनचा संघही अपयशी ठरला. भारतानेही त्यांना सहजासहजी जिंकू दिले नाही. वीसपैकी पंधरा टेस्ट ड्रॉ झाल्या.
“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.
युद्धाचे अर्थ आता बदलले आहेत. अमेरिकेला एखाद्या देशात घुसून तो देश ताब्यात घ्यायचा असला तरी ते आता शक्य नाही. तसे असते तर इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकन निवडणुकांचे मतदान होत असते. पाकिस्तानकडे अफाट सामर्थ्य असते आणि त्यांनी काश्मीर काबीज केले असते तरी काश्मीर त्यांच्या नावावर नसता, आंतरराष्ट्रीय एजन्सीनी युद्धविराम घोषीत करवला असता आणि सीमा निश्चित केल्या असत्या.
“पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले."
- जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ)
"कोण जिंकतो आणि कोण हरतो याने काय फरक पडतो? त्यांना कश्मिर हवे होते. ते मिळाले का? नाही. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले.