Skip to main content

इतिहास

वारी !!!

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 27/05/2025 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 20/05/2025 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

धामणस्करांची 'वोक' कविता

लेखक माहितगार यांनी रविवार, 04/05/2025 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 23/04/2025 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

Schindler List शिंडलर लिस्ट

लेखक Bhakti यांनी सोमवार, 21/04/2025 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
Q दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने । युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥ अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना. खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली. द

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 18/04/2025 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

रोजचे मरणे - गूगल एआयची कविता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2025 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
हि मी गूगल एआयला मुद्दाम लिहिण्यासाठी सांगितलेली कविता नाही. माझ्या याझिदी विषयक एका धागा लेखास मिपाकर चित्रगुप्तांनी "While living, be a dead one चा स्वानुभव." शिर्षकाचा प्रतिसाद दिला. अशाच आशयाच्या कुणा प्रसिद्ध कविच्या एखाद दोन कविता वाचनात येऊन गेल्याचे आठवत आहे पण नेमका कवि कविता किंवा कवितेच्या ओळी आठवत नाहीत म्हणून गूगल बाबाला "रोजचे मरणे कविता" हा शोध दिला तर गूगलबाबाने एआयच्या मदतीने स्वतःचीच कविता सादर केली.

लोकमान्य(होमरूल -स्वराज्य संघ)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/04/2025 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
१ १८८८ ला स्थानिक परिषदेतून टिळक कॉंग्रेसमध्ये आले.कर्झनच्या अन्यायकारी बंगालच्या फाळणीच्या कारस्थानानंतर कॉंग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांची फळी त्यांनी प्रस्थापित केली.परंतू जहाल -मवाळ वादात जहाल मतवाद्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,कॉंग्रेस फुटली.पुढे टिळकांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासा

लोकमान्य (राजद्रोह खटला)

लेखक Bhakti यांनी बुधवार, 02/04/2025 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे. टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये. १.

दोष व्हीआयपी सुरक्षा यंत्रणेचा: स्वर्गीय इंदिरा गांधी आणि छत्रपति संभाजी राजे

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 25/03/2025 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
देशात छावा चित्रपट गाजला. माझ्या एका मित्राने फोन वर मला विचारले, विवेक तू तर देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत आणि एसपीजीत काम केले आहे. या विषयावर तुझे विचार काय आहे. मराठी इतिहासबाबत थोडे बहुत ही लिहले आणि ते जनतेला पटले नाही तर जन भावनांचा भडका उडू शकतो. बिना कुणाच्या भावना दुखविता यावर भाष्य करणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी ही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोणातून हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारताच्या युद्धाच्या सुरवात होण्यापूर्वी दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देश्यून म्हणतो, पितामह भीष्मच्या नेतृत्वात आपले सैन्य अजेय आहे. सर्वांनी पितामह भीष्माची रक्षा करावी.