Skip to main content

जीवनमान

HATS ऑफ टू फिलीपिनोज,

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 08/12/2014 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेली चार दिवस नुसत प्रत्तेक लोकलच नाही तर इंटरनेशनल न्यूज चानेस्ल वर, वृत्तपत्रात, सगळीकडे, एकच चर्चा, “रुबी” (इंटरनेशनल नाव Hagupit) येतंय. त्याच्याशी लढण्यासाठी पिनॉय (फिलिपिनो लोक) सज्ज होत आहेत. ह्या बद्दल बोलण्या अगोदर थोडी या देशाची ओळख करून घेऊयात. फिलिपिन्स – थोडी ओळख नैसर्गिक वैविध्यतेने नटलेल फिलिपिन्स हा जवळ जवळ 7,107 लहान मोठ्या बेटांचा समूह. एकूण क्षेत्रफळ ३००,००० स्क़्वेर किमी. एकूण लोकसंख्या १०० मिलिअन (जगातील १२ वा सर्वात जास्त लोक्संखेचा देश, आणि आशियातला ७ वा) आणि, वेगवेगळ्या देशात विस्थापित झालेल्यांची संख्या जवळ जवळ १२ मिलिअन.

भारतीय स्थलांतरे, सामाजीकरण आणि समरसता- भाग १ राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/12/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी स्थलांतरांना खूप मोठा इतिहास आहे तसा तो भारतीय स्थलांतरांनासुद्धा असणे ओघानेच येते. एकदा अधीक जुन्या इतिहासात गुंतले की काही वेळा अलिकडील इतिहासाचाही मागोवा घ्यायचे राहून जाते म्हणून या विषयाची सुरवात स्वातंत्र्योत्तर भारतापासून करतो आहे. मानवी स्थलांतरांची शिक्षण, दुष्काळ ते रोगराई अथवा उपचार, व्यवसाय बदल अशी बरीच कारण असू शकतात. अर्थात स्थलांतर करणार्‍यांच एक मोठ प्रमाण पोटापाण्यासाठी स्थलांतर करण्यामुळे होते. अधिक उत्तम संधी तिकडे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. या स्थलांतरांमुळे स्थानिक आणि स्थलांतरीतांची विवीध स्वरूपाच्या देवाण घेवाणी सोबत सांस्कृतीक देवाण घेवाणही होत असते.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

लेखक संपादक मंडळ यांनी सोमवार, 08/12/2014 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 ******************************************** नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया!

साल्याने पेपर टाकलाय.......

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 03/12/2014 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता. साल्याने पेपर टाकलाय................... तो रोज ऑफिसला येतो वेळेत येतो; वेळेत जातो नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही जास्त सुट्या घेत नाही, घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; कलटी टाकत नाही ओव्हर टाइम कधी मागत नाही कॉम्प-ऑफ कधी घेत नाही. मोबाईल वर फोन आला; तर साहेबासमोर बोलत नाह

बिल्डिंग अ स्ट्राँग फाउंडेशन - पायांचे साधे, सोपे व्यायाम

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 02/12/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी काही लिहीण्या आधी काही डिस्क्लेमर्स देत आहे. लेखन व्यायाम/व्यायामप्रकार विषयक आहे. तरीही, मी व्यायामतद्न्य, प्रशिक्षक इत्यादी नाही. माझ्या कुतुहलजन्य माहितीस मी इथे केवळ मांडत आहे. यास किंचितशी अनुभवाची किनार असली तरी 'स्वानुभवातून सांगतोय' म्हणण्याइतकी नाही. खाली दिलेले काय, किंवा कुठलेही व्यायामप्रकार एक तर स्वतःला सांभाळून, कुवत ओळखून वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत. झालं. तर! आता मुद्द्याकडे वळतो. एक सुरेख क्वोट वाचलं होतं कुठेतरी.

न्यूनगंड

लेखक प्रतापराव यांनी शुक्रवार, 28/11/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी एक सल्ला हवा होता. नुकतीच एक जुनी चारचाकी घेतली आहे. आधी ट्रेनिंग स्कूल मध्ये जावून २० दिवस प्रशिक्षण घेतले. लायसन्स मिळाले परंतु गाडी चालवण्याचा आत्मविश्वास नाही. गाडी मध्ये बसल्यावर भीती वाटते कि आपण चालवू शकू कि नाही बाजूला कुणीतरी गाडी चालवता येणारा मित्र असला तर थोडा धीर येतो मात्र गाडी वळवताना वेगात जात असे वाटते नि बर्याचदा गाडी चालवताना मध्ये बंद पडते. आत्मविश्वासच राहिला नाही असे वाटते. आजूबाजूला इतर लोक आत्मविश्वासाने गाडी चालवताना पाहून मनात एकप्रकारचा न्यूनगंड आला आहे. हे एक उदाहरण झाले तसेच चारचौघात मिसळण्याचीही भीती वाटते.

आहे रे नाही रे , हिरावणे आणि तुलना उपदेश या बाबत थोडेसे ...

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 28/11/2014 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला सुचलेले काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. आपल्याला पटले किंवा नाही ते कळवा: (१) आहे रे आणि नाही रे...!! (अ) "आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे" - इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका. नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय?? (ब) "आपल्याजवळ जी गोष्ट आहे पण इतरांजवळ नाही" - आपल्याकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि इतरांना मिळावी यासाठी प्रार्थना करा. पण ती गोष्ट आपल्याजवळ असल्याचा अभिमान व गर्व बाळगून इतरांना कमी लेखू नका.

हॅप्पी थॅन्क्स गिव्हिंग

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 27/11/2014 13:15 या दिवशी प्रकाशित केले.

हॅप्पी थॅन्क्सगिव्हिंग

|| ॐ दवणेय नमः || माझ्या मिपावरील सर्व मित्र मैत्रीणींना आज थॅन्क्स गिव्हिंगच्या निमित्ताने मी धन्यवाद देवु इच्छितो ! मिपावरील चर्चात , काथ्याकुट मधील कचकचीत वादात , कवितांमध्ये , लेखनांमध्ये , भटकंतीच्या धाग्यांमध्ये आपण ज्याप्रकारे प्रतेकाला सामावुन घेता त्याला तोड नाही . मिसळसळ्व्पाववर येवुन कधी मिसळलो झालो ते कळालेच नाही .

जबाबदार/जबाबदारी

लेखक शिरीष फडके यांनी सोमवार, 24/11/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
जबाबदार/जबाबदारी जबाबदार आणि जबाबदारी हे शब्द राजरोसपणे वापरले जातात. मुलांची जबाबदारी, कामाची जबाबदारी, आईवडिलांची जबाबदारी अशा अनेक जबाबदार्या आम्ही पार पाडत आहोत किंवा उचलत आहोत किंवा निभावत आहोत असं बहुतेकदा ऐकायला मिळतं. पण नक्की जबाबदारी म्हणजे काय? कर्तव्य, काळजी आणि प्रेम यांचं जबाबदार किंवा जबाबदारी या संज्ञेशी नातं काय? जबाबदार आणि जबाबदारी यामध्ये नक्की अंतर किती? असे अनेक प्रश्न आणि त्यांची उकल म्हणजेच पुन्हा एकदा चिकित्सा. यासाठी आपण एका छोट्याशा गोष्टीचा आधार घेऊया. तसं हॉस्टेलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिस्त.

नातं - भाग २

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 21/11/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
नातं - भाग २ प्रत्येक व्यक्तिची साधारणतः किंवा प्रामुख्याने चार प्रकारची आयुष्यं असतात. वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक आयुष्य. या चार निरनिराळ्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजेच चार वेगवेगळ्या प्रकारची नाती. वैयक्तिक नातं, कौटुंबिक नातं, सामाजिक नातं आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक नातं. या प्रत्येक नात्यामध्ये एक ठरावीक भूमिका प्रत्येक व्यक्ती बजावत/निभावत असतो. पण जर त्या भूमिकांची सरमिसळ झाली तर काय होतं ते या कथेतून समोर येतं.