Skip to main content

जीवनमान

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल!

क्लास

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 14/10/2014 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई.

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 11/10/2014 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे, नव्हे त्यापेक्षाही वेगळ काही वाटत तुमच्याविषयी, कुठे तरी आशेचा किरण जाणवतोय्,की जगात सगळेच प्रश्न काही तलवारीच्या धारेवर आणी बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत्,तुमच्याकडे पाहुन पटतय मला की प्रेमानेही आणी अहिंसेने बरच काही शक्य होते,ज्या सिद्धार्थ गौतमाचे,महात्म्याचे,आणी दिनदुबळ्यांची आई मदर तेरेसाच्या तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या माझ्या भारतभुमीचा उर आज आनंदाने भरुन आला असेल.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

लेखक अमित खोजे यांनी गुरुवार, 09/10/2014 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वी . . . आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला. जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)! पुढे चालू . . .

मी लोकलयात्री

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 08/10/2014 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 01/10/2014 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते.

अभिनव विचार संग्रह - (१)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 01/10/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!

वर्धमान ते महावीर - भाग ३

लेखक दशानन यांनी मंगळवार, 30/09/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती.

दसरा

लेखक लाडू यांनी सोमवार, 29/09/2014 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल राती आकाशात, चांद दिसला हासरा कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा, आला दसरा दसरा परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्‍याचा मान, देती सोन्याचेहि पान! नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान! येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा, सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा! आला दसरा दसरा
काव्यरस