Skip to main content

जीवनमान

परदेशातला संस्कृती संगम

लेखक कल्पक यांनी रविवार, 31/08/2014 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अनेक शतकांपासून माणूस हा शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी ह्या कारणांसाठी स्थलांतर करतोय आणि नविन प्रदेशाशी जुळवून घेताना आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती ह्यांचं आवर्जून जतन करतोय. आज तंत्रज्ञानामुळे आणि प्रगतीच्या संधींमुळे देशादेशातील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती एकमेकांमध्ये मिसळत आहेत. आणि जागतिक खेड्यातील ह्या संस्कृतीसंगमामध्ये प्रगतीसाठी धडपड हा एक समान धागा आहे. अशा संस्कृतीसंगमामध्ये खाद्य पदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे.

जुना किस्सा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 30/08/2014 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुना किस्सा आहे... उद्योजक असताना ब्यांके कडुन कर्ज घेतले होते..नियमाप्रमाणी क्वारट्रली "इंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला. यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."ईंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाहि.." यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना.. या वर त्याने एक गोष्ट सांगितली.. नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेढी होती.. पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत.. एकदा अचानक पेशव्यानं पगारा साठी पैशाची गरज लागली...

सुतक

लेखक स्वतन्त्र यांनी शुक्रवार, 29/08/2014 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली.

वर्धमान ते महावीर - भाग 2

लेखक दशानन यांनी गुरुवार, 28/08/2014 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते.

वर्धमान ते महावीर

लेखक दशानन यांनी मंगळवार, 26/08/2014 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 24/08/2014 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला. सध्या तो जागेच्या शोधात आहे. आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम. बादवे, जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम. आणि इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम. कळावे लोभ आहेच, तो वाढावा... मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)

चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन

लेखक खेडूत यांनी शनिवार, 23/08/2014 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) मागील भागांमध्ये आपण वाहन उद्योगातले विविध घटक आणि त्यांचा परस्पर संबंध याविषयी माहिती घेतली. महाग गाड्या का महाग होत असतात हे आपण पाहिलं. त्यातले आणखी बारकावे समजण्यासाठी थोडी अधिक माहिती घेऊयात.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 19/08/2014 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती.

आजार!

लेखक कवितानागेश यांनी शनिवार, 16/08/2014 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजार हल्ली मनोविकारांवर काही वाचन झाले. ज्या रोगाचे हजारात निदान ७ जण बळी अहेत, अश्या एका कष्ट्साध्य रोगाबद्दल काही विशेष मुद्देसूद माहिती मिळाली. त्या निमित्ताने हे प्रकटन. स्किझोफ्रेनिया -Paranoid schizophrenia या आजाराबद्दल खरं तर फार लहानपणीच कळले होते. कधीतरी मेंदूतच काहीतरी बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो इतके नक्की माहित होते. हे लोक अचानक विनाकारण चिडतात, त्यांचा सोशल सेन्स संपतो. पण अजूनही अश्या पेशंट्स चे नक्की कधी, कसे काय बिघडते हे अज्ञातच आहे. फक्त कुठल्यातरी गोष्टीचा अचानक आत्यम्तिक 'गंड' निर्माण होतो, आणि सतत त्याबद्दल बोलतात. रोजच्या गोष्टी, जमेनाश्या होतात.

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

लेखक विलासराव यांनी शनिवार, 16/08/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे.