मनात पूजीन रायगडा !!!
पायाखालची रायगड जिल्ह्याची माती सुटून आता दहा वर्ष झाली मात्र त्या मातीचा सुगंध आजही मनात दरवळतोय.
असं वाटतं की शाळेत आपल्याला पुर्ण नांव सांगायला सांगितलं आहे आणि आपण नांव सांगून झाल्यानंतर एका दमात "मुक्काम वडगांव कोंड पोष्ट गोरेगांव तालुका माणगांव जिल्हा रायगड" असा पत्ता सांगत आहोत.
गावातून बाहेर पडून पूर्वेला तोंड करुन उभे राहीले की दूरवर समोर दिसणारा कावळे घाट आणि त्याच्या पाठीमागे दिमाखाने उभा असलेला छत्रपतींचा रायगड आजही नजरेसमोर तरळतो. लहानपणी आजीने सांगितलेली आख्यायिकाही आठवते. आमचे पोष्ट असलेल्या गोरेगांवाचे नांव म्हणे पूर्वी घोडेगांव होते.
मिसळपाव