Skip to main content

जीवनमान

माझी बायपोलर डिसॉर्डर

लेखक शुचि यांनी सोमवार, 21/04/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी डॉक्टर नाही, हे एक प्रांजळ आत्मकथन आहे केवळ या २ हेतूनी केलेल (१) की जर कोणी अशी लक्षणे अनुभवत असेल तर त्यांना मदत व्हावी (२) माझ्या समाधानाकरता की माझे सत्य सांगीतले, माझी कथा सांगीतली या धाग्यावर अवांतर न केल्यास उपकार होतील ____________________________________________
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअ‍ॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."
आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद.

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 18/04/2014 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.

चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 18/04/2014 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल कार बनवणे आणि विकणे इतकं आव्हानात्मक आहे हे त्यावर काम करण्याआधी माहीत नव्हतं. यावेळी आपण कार बाजाराची गुंतागुंत ( Complexity) आणि ग्राहकाची निर्णय प्रक्रिया पाहूयात, म्हणजे नंतर त्याचा संदर्भ येईल तेव्हा पटकन लक्षात येईल. अर्थात दुचाकीला पण बऱ्याच प्रमाणात हे सगळं लागू होतं, पण दुचाकीसाठीची ही प्रक्रिया थोडीशी सोपी आहे. गिऱ्हाइकाच्या मनाचे खेळ वाहनाच्या उपलब्ध प्रकारात आणि पर्यायात थेट परावर्तित होतात. जगात कुणाला काय आवडेल हे अचूक कसं सांगणार? यासाठी मार्केटिंग- विपणन विभागात अनुभवी संशोधक काम करत असतात.

केलं की नाही?

लेखक साती यांनी गुरुवार, 17/04/2014 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत. राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ? या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ. माहिती लिहिणे अपेक्षित आहे. बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते! आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!

पुणे रनिंग

लेखक बाळ सप्रे यांनी शनिवार, 12/04/2014 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे रनिंग धावण्याचं एवढं वेड लागु शकतं हे मला पुणे रनिंगशी संबंध येईपर्यंत कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुणे रनिंग (https://www.facebook.com/PuneRunning) हा एक धावण्याची आवड असलेल्या पुण्यातील लोकांचा ग्रुप आहे. धावपटू घडवून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे वगैरे मोठी स्वप्न नाहीत, घटना नाही, पदाधिकारी नाहित, राजकीय पाठींबा नाही पण सामान्य लोकांना धावण्यासारखी आरोग्यदायी सवय लावणे हा साधा स्वच्छ हेतु. एकट्याने खूप वेळ धावणे बहुदा कंटाळवाणे होते म्हणून ग्रुपमधे धावले जाते.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 11/04/2014 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

संशय

लेखक जातवेद यांनी गुरुवार, 10/04/2014 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यातल्या मेंदुच्या तंतुमय जगात संशय नावाची एक अस्सल जमात त्या जमातीचा म्होरक्या मी स्वतः आणि माझेच विचार त्याची माता उगा कायपण ऐकून फ़िरते हे डोके सापडल ती दिशा घेउन सटकत रहाते आपणच ओतायला तेल काढते वर ओतून पुन्हा स्वतःच पेटते महायुध्दं भडकतात डोक्यात माझ्या सद् असद् विचारांना मी देतो रजा खऱ्या खोट्याची शहानीशा? पर्वा नाय कारण चढलाय नशा नाहि म्हणायला कोणितरी समजाउ पाहते जाउदे म्हणत विसरयला सांगते एक एक तंतु जळून खाक होत असतो पण मनातील सल मात्र तशीच राहते

ओवाळणी

लेखक मीराताई यांनी बुधवार, 09/04/2014 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्यासारखंच मुलांना बालमंदिरात सोपवून आम्ही मैत्रिणी घरी निघालो. सकाळच्या धावपळीनंतर हे मैत्रिणींसोबत गप्पा करत, हसत-खिदळत घरची वाट चालणं म्हणजे सगळा शीण घालवून उत्साहाची ओंजळ भरून घेणं असायचं. त्या दिवशीच्या गप्पांत विषय दिवाळीचा होता. सण तोंडावर आलेला. सुटीचे बेत, सणाची खरेदी. एकेकीचा उत्साहा उतू चालला होता. त्यातच एकजण हसत सांगू लागली, काल मी यांना विचारलं, 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!' तिच्या हसण्याला इतरांनीही साथ दिली. मला मात्र त्या क्रूर विनोदाचं हसू आलं नाही. तिच्यावर झालेल्या त्या वाराने माझंच मन विध्द झालं, पार विस्कटलं.

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 07/04/2014 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले.

सुख म्हणजे नक्की काय?

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 07/04/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले.