Skip to main content

जीवनमान

दारु पुराण

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 12/05/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥ रोज येतो दरु पिऊन बाटली खिशामद्ये घेऊन सांगे रुबाबात येऊन चल वाढ मला भोजन रोज हवी मच्छी मटण बायको आण्ल सांगा कुठुन रागाने ऊठतो पेटून अर्ध्या जेवणावर ऊठुन होते त्याची चालू,ही बडबड आता ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥ मुले कावरीबावरी होऊन आईच्या पदराखाली लपून ऊपाशी पोटी जाती झोपून याची थोडीही नाही त्याला जाण आई त्यांची कष्ट करुन देई मुलांना चांगले शिक्षण मुलेही हुशार आणि गुणवान फेडतील आईचे त्यांच्या ऋण मुलेच खरी तिची संपत्ती व सत्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥२॥ दहा तारखेला होतो पगार जमे सारा मित्र परिवार दरु पिऊन चाल
काव्यरस

जुने ते सोने..

लेखक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार, 11/05/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आताच्या माझ्या आजारपणात १ उपाय बाकी नामी सापडला किंवा जुना उपाय नामी आहे हे सिद्ध झाले म्हणूयात. तो असा कि अंगात ज्वर असेल तर आणि paracetamol /antibiotic ने पण फरक पडत नसेल तर कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. यात ताप वेगवेगळ्या पद्धतीने उतरू शकतो. ५ दिवसांपूर्वी माझे अंग रस चोळल्या वर १० मिनटात थंड पडले आणि रात्री तर थंडी वाजली. काल मात्र पाय अजून गरम झाले आणि नंतर थंड.(अंतिम परिणाम-ताप उतरला).५ दिवसात फक्त दोनदा हा उपाय केला. रोज नाही. बरेचदा अंगात आपल्याला चांगलाच ताप वाटतो पण thermometer मध्ये तो दिसत नाही , अश्या वेळेस हा खंग्री उपाय आहे.

व्यायामाचे प्रकार

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 11/05/2013 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम... पण याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत.

थोडे मर्मबंधातील ...

लेखक ढालगज भवानी यांनी सोमवार, 06/05/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर थोडा बायकी विषयच. मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय. आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते.

दादी के हाथों को जलता देख...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 06/05/2013 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्राध्यापक अशोक चक्रधर. हिंदीतले एक अत्यंत दिग्गज कवीवर. एक विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व..एक भाषाप्रभू, एक शब्दप्रभू..त्याचप्रमाणे एक अत्यंत मिश्किल, हसरं व्यक्तिमत्त्व. एखाद्या विनोदाला मनमुराद दाद देताना अगदी सोडावॉटरची बाटली फुटावी असं खळखळून, मनमोकळं हसणारं व्यक्तिमत्त्व..परंतु त्याचवेळी एक तेवढंच संवेदनशील व्यक्तित्व..जीवनाकडे, माणसांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहणारं एक सहृदय व्यक्तिमत्त्व.. माझे ज्येष्ठ मित्रवर्य दिवंगत वसंत पोतदारांसोबत एकदा दिल्लीला गेलो असताना त्यांच्यामुळे मला अशोक चक्रधर या विलक्षण माणसाला भेटण्याचा योग आला..

कबुतरांची सभा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/05/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वा एका सरकारी हापिसात कामासाठी गेलो होतो आणी नेहमी प्रमाणे वाट बघत ताटकळत उभा होतो. कडेला वाटलं माणसं बोलताहेत पण कबुतरं बोलत होती कालच्या दिवसात काय काय झालं? याचे हिशेब तोलत होती पहिलं दुसर्‍याकडे पाहुन मिष्किलपणे हसत होतं आणी त्यांच्या गमती पाहुन तिसरं मधिच घुसत होतं काल म्हणे पहिल्याला आख्खं कणिस मिळलं पण दुसर्‍यानं धक्का दिला आणी ते हवेतच गळलं थोड्याच वेळात कबुतरांची भली मोठ्ठी सभा भरली आणी आज चरायला कुठं जायचं? यावरच पहिली चर्चा ठरली कुणी म्हणलं किराणा दुकान आजचा पहिला ठराव आहे धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन कशाला मोकळं सोडायचं? पण त्या बेन्
काव्यरस

धरण उषाला कोरड घशाला

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 03/05/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत हांडाभर पाण्यासाठी आम
काव्यरस

लहानपण देगा देवा....

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 03/05/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं.

प्रिय नाना पाटेकर,

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 29/04/2013 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता.. नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं.. हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..? नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..???? नान्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे नरीमन पॉइंट..कफ परेड..

सबलीकरण

लेखक आतिवास यांनी सोमवार, 29/04/2013 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते. मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत. मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत. मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही. मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही. माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही. मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत. मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही. मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच,