Skip to main content

जीवनमान

वेडी....

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/04/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे ९० चं दशक असेल.. ठाणे स्थानकावर एक वेडसर भिकारीण दिसायची.. नेहमी तिच्या हातात एक तान्हं मूल असे..तिच्या हावभावावरून, वागणुकीवरून ती वेडसर होती हे निश्चित.. रहायचीही स्थानकाच्याच परिसरात.. आता सतत अगदी जातायेता तिच्यावर लक्ष जायचं असं नव्हे..परंतु ती दिसायचीच.. ती दिसली की माझ्यासारखे अनेक जण कदाचित तिला नोटीस करत असतील आणि अनेक जण नसतीलही.. या गोष्टीला, म्हणजे तिच्या अशा नेहमी दिसण्याला माझ्या आठवणीप्रमाणे ५-६ वर्ष तरी सहज झाली असतील.. त्यानंतर एकदा केव्हातरी देवेन्द्र मिश्राशी बोलताना अगदी सहजच तिचा विषय निघाला होता..

निमित्त फक्त एका भेटीचे

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 08/04/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त फक्त एका भेटीचे परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर. निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.

वेदना

लेखक रेशा यांनी शुक्रवार, 05/04/2013 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई वेदना मुकेपणाची, सलत आत राही निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई ... रेशा
काव्यरस

ओज-शंकराची कहाणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 03/04/2013 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे. भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्‍यात झाले.

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/03/2013 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्‍याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले.

मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !

लेखक आशु जोग यांनी रविवार, 31/03/2013 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते. मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते. भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे. तर असे सांगितले जाते की या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला. हे कितपत सत्य आहे ? विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले. तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ? पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ? विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत.

घरगुती फेसपॅक व अन्य टीप्स

लेखक शुचि यांनी रविवार, 31/03/2013 05:51 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे- (१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव. (२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव (३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही. या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो.

कालाय तस्मै नम: !

लेखक गोगट्यांचा समीर यांनी शुक्रवार, 29/03/2013 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार . मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी बरयाच सोयी-सुविधा मोफत दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट देण्यात आली . ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता. एकूणच सगळं ऐटीत चालल होतं . शहरातले लोक सुजाण , सुशिक्षित आणि कामसू होते. त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या आपल्या संस्थेत जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली वागणूक मिळत असे.

अंड्याचे फंडे ३ - छंद

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 29/03/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.." ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली. डोळ्य़ांच्या खाचा अन पोटाचे खळगे, आयुष्यातील खाचखळग्यांचे चेहर्‍यावर उमटलेले प्रतिबिंब, खुरटलेली दाढी अन डोक्यावरची उरलीसुरली चांदी, हसले की गंजलेल्या करवतीसारखी दिसणारी दंतपंक्ती, असा आमचा टिपिकल लोअर मिडलक्लास म्हातारा दगडूशेट.