Skip to main content

जीवनमान

थँक्यू डॉक्टर देशमुख

लेखक रामबाण यांनी मंगळवार, 12/02/2013 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
मना कधी नव्हे ते २-३ तास खूप रडली. आत्ताच झोपी गेल्याचं अंजलीनं सांगितलं. तिचं रडणं थांबत नव्हतं. विजयसोबत अंजली मनाला एका प्रथितयश डॉक्टरकडे दाखवून आलेली. विजय त्याच्या मुलीला त्याच डॉक्टरकडे घेऊन जायचा.म्हटलं बरं झालं, लहानांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. त्या डॉक्टरीनबाईनं मनाला कसलं तरी इंजेक्शनही दिलं होतं. त्या गुंगीतच ती कदाचित रात्रभर झोपली असावी. मी सकाळीच ऑफीसला निघून गेलो. त्यावेळेस मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात यायचा होता. त्यामुळे घरी टचमधे राहण्याचा प्रश्नच नव्हता.

इश्कबाजांच्या मैफिलीत

लेखक अधिराज यांनी शनिवार, 09/02/2013 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
इश्कबाजांच्या मैफिलीत तू असावीस गाजलेली नशा शायरीत आणताना तू असावीस लाजलेली. दो जीवांची स्पंदने ही असावी तुझ्यातच रुजलेली वसंतातले रंग लेऊन तू असावीस सजलेली. घेऊन चांदणे उशाला तू असावीस निजलेली धुंद जाणिवेच्या धारांमध्ये तू असावीस भिजलेली. विरहसमय आला तरी नसावी प्रेमवात विझलेली बहू पालटले ऋतू जरी नसावी गझल झिजलेली.

बोलतो जे अर्णव

लेखक रामबाण यांनी गुरुवार, 07/02/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
एके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा? मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं..

'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 06/02/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

जावई बसले अडून

लेखक अधिराज यांनी मंगळवार, 05/02/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

जात जातच नाही ... काय करू??

लेखक दीपकशेठ यांनी सोमवार, 04/02/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना...

मुक्ताजोबा...

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 31/01/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपावर नीलकांतचा लेख वाचला (माझे आजोबा - एक आठवण) आणि न राहवून हा लेख इथे प्रसिद्ध करत आहे. लेख जिने लिहिलाय ती माझी शाळेतली मैत्रीण, हल्लीच परत नव्याने सापडलेली. तिच्या परवानगीनेच तिचे खरे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर, हा लेख इथे प्रसिद्ध करतोय. त्यामुळे कॉपीराईटची समस्या होणार नाही याची खात्री बाळगावी.