Skip to main content

जीवनमान

तुकोबा जितोबा तुकाराम... ढिंच्याक ढिच्यांग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 08/06/2012 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
येणार येणार म्हणुन ज्याची वाट पहात होतो,तो अमच्या जित्याचा,,, होय जित्या म्हणजे जितेंद्र जोशी यानी साकारलेला त्याच्या इतकाच सहज सुंदर चित्रपट ''तुकाराम''... काय वर्णू ज्याच्या लीला अगाध,अंतरीची कळा तोच असे। सहजभावी सामर्थ्य,हेची मूळ रूप,तया अंतरी अन्य,काही नसे॥ या दोन ओळी आमच्या जित्याला मनापासून समर्पीत करुन हा एक जिवंत/मनस्वी/स्फूर्तीदायक चित्रानुभव लिहायला घेतो...

Near Death Experience.. अनुभवलाय कधी..?

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 08/06/2012 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
______________________________________ Dyatlov Pass आणि सध्याचे कांही धागे वाचून सुचलेला विषय.. ______________________________________ शनिवार, २७ मार्च २०१०, कोर्टयार्ड मॅरीयॉट, हिंजवडी. प्रत्येक महिन्यातून (पूर्ण) दोन दिवस चालणारी क्लायंट मिटींग नेहमीपणे सकाळी सुरू झाली. मागच्या महिन्याचा प्रोजेक्ट परफॉमन्स, रीजनल परफॉमन्स, पुढची टारगेट्स वगैरे नेहमीचे विषय रवंथ करत करत एकदाचे रात्रीचे आठ वाजले व मिटींग संपली. कॉकटेल / मॉकटेल प्रकार सुरू झाले.

आमचा दुष्काळ

लेखक भरत कुलकर्णी यांनी गुरुवार, 07/06/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा साला पाऊस बरोबर सुरू होतो उगाचच आपला टँकरचा हप्ता चुकतो. या वर्षीदेखील पाऊस वेळेवर सुरू होईल. चार्‍यासाठी अनुदान, दुष्काळी मदत, दुष्काळग्रस्त भागाला भेटीची बिले हे सारे बंद होईल; अन वरकमाईदेखील चुकेल इतरांचा पाण्याचा दुष्काळ संपेल पण आमचा पैशांचा दुष्काळ आता सुरू होईल. पावसा, का रे बाबा तू वेळेवर येतोस अन आम्हाला दुष्काळात लोटतोस?

चित्रपटात सर्वप्रथम!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 06/06/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी.
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!

जगज्जेता विशी!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/06/2012 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते! ३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले!

इंटरव्हेन्शन

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 02/06/2012 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं. पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात.

जात जात जात

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 29/05/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे तिथे चहुकडे आम्हा लिहावी लागते जात. जन्म घेतल्याक्षणीच आमच्या मागे लागते जात. जन्म नोंदणी करतेवेळी लिहावी लागते जात. शाळेत दाखल करताना लिहावी लागते जात. फी भरतानाही शाळेत पुन्हा पाहिली जाते जात नोकरीसाठी वणवणताना लिहावी लागते जात. ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात. नालायकांच्या नालायकीची आधार असते जात. अपयशाला नि न्यूनाला पण लपवून ठेवते जात लायकीला पण बंधन नसते, नसते कुठली जात बढतीसाठी हापिसात रांगा, सांगा पुन्हा जात तुमची आमची रांग वेगळी, वेगळी तुमची जात दहावी, बारावीत बोर्ड सांगतं, वेगळी तुमची जात सैनिकांच्या पलटणीतूनही दिसून येते जात इलेक्शनच्या फडी उतरता, लिहावी लागते ज
काव्यरस